Two Mumbai doctors receive Pakistan’s top honour: मुंबईतील दोन पारसी डॉक्टरांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान-ए-इम्तियाज’ जाहीर करण्यात आला आहे. कारण पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या गंभीर आजाराची माहिती त्या डॉक्टरांनी गुप्त ठेवली होती. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. जिना यांना क्षयरोग (टीबी) झाल्याचे निदान या डॉक्टरांनी केले होते. मात्र, वैद्यकीय गोपनीयतेच्या नियमांचे पालन करत त्यांनी ही माहिती सार्वजनिक केली नाही. पाकिस्तान सरकारच्या मते, या गुप्ततेचा देशाच्या निर्मितीवर ऐतिहासिक परिणाम झाला.
Shiv Sena Symbol Supreme Court Hearing : धनुष्यबाण चिन्ह गोठणार? आज ठाकरे गटाकडून अंतिम युक्तिवाद
पाकिस्तानचे नियोजन मंत्री आणि पुरस्कार समितीचे अध्यक्ष अहसान इक्बाल यांनी या निर्णयाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिना यांच्या प्रकृतीची गंभीर माहिती ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचली असती, तर भारताच्या फाळणीचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता होती.
कोण होते हे दोन डॉक्टर?
जिना यांच्या आजाराचे निदान करणाऱ्या डॉक्टरांमध्ये डॉ. जल रतनजी पटेल आणि डॉ. जल धायभो-कू या दोन डॉक्टरांचा समावेश होता. डॉ. पटेल हे फिजिशियन, तर डॉ. धायभो-कू हे रेडिओलॉजिस्ट होते. दोघांनीही जिना यांना क्षयरोग असल्याचे निदान केले होते.
लाडकी बहीण योजना, तब्बल 92 लाख महिला अपात्र; धक्कादायक आकडेवारी समोर
मात्र, रुग्णाच्या वैद्यकीय माहितीची गोपनीयता राखणे हे डॉक्टरांचे कर्तव्य असल्याने त्यांनी जिना यांच्या आजाराची माहिती बाहेर जाऊ दिली नाही. अनेक वर्षांनंतर पाकिस्तान सरकारने या निर्णयाकडे देशाच्या इतिहासावर परिणाम करणारी घटना म्हणून पाहिले आहे.
जिना यांच्या आजाराची माहिती समोर आली असती तर?
अहसान इक्बाल यांनी जिना यांचा आजार ही विसाव्या शतकातील अत्यंत महत्त्वाची गुप्त बाब असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी क्षयरोगावर प्रभावी उपचार उपलब्ध नव्हते. त्यामुळे जिना फार काळ जगणार नसल्याचे ब्रिटिश सरकारला कळले असते, तर फाळणीच्या निर्णयावर त्याचा परिणाम होऊ शकला असता.
IND vs SL : भारतीय संघ खेळणार WTC फायनल? श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर जाणून घ्या समीकरण
भारताची फाळणी झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात, 1948 मध्ये जिना यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची खरी स्थिती ब्रिटिश प्रशासनाला माहीत असती, तर पाकिस्तानच्या निर्मितीची प्रक्रिया वेगळ्या दिशेने गेली असती, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. फाळणी लांबली असती तर पाकिस्तानच्या निर्मितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते, असे तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी नंतर म्हटल्याचा संदर्भही देण्यात आला आहे. अशा प्रकारे, या दोन डॉक्टरांनी पाळलेली वैद्यकीय गोपनीयता पाकिस्तानच्या इतिहासातील एका निर्णायक टप्प्याशी जोडली गेली आहे.
23 मार्चला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार
पाकिस्तानचे राष्ट्रीय नागरी आणि लष्करी पुरस्कार दरवर्षी 14 ऑगस्टला जाहीर केले जातात. त्यानंतर 23 मार्च 2027 रोजी पाकिस्तान डेच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातात. यापूर्वी 1998 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनाही पाकिस्तानच्या ‘निशान-ए-इम्तियाज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
