अग्निवीरांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवा आणि विवाहाची परवानगी, चार आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य!

चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांच्या अतिरिक्त सेवेसाठी संधी निवडणाऱ्या अग्निवीरांना विवाह करण्याची परवानगी मिळणार.

Untitled Design   2026 11 22T181800.375

Untitled Design 2026 11 22T181800.375

Two years of additional service and permission to marry for Agniveers : अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरती झालेल्या अग्निवीरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चार वर्षांची सुरुवातीची सेवा पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांच्या अतिरिक्त सेवेसाठी संधी निवडणाऱ्या अग्निवीरांना विवाह करण्याची परवानगी मिळणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, यासाठी त्यांना दुसऱ्या ‘टूर ऑफ ड्युटी’दरम्यानचे सुमारे चार आठवड्यांचे संक्षिप्त प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच विवाहाची परवानगी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अग्निपथ योजनेनुसार, भरतीच्या वेळी उमेदवार अविवाहित असणे बंधनकारक आहे. तसेच पहिल्या चार वर्षांच्या सेवा कालावधीत अग्निवीरांना विवाह करता येत नाही. मात्र, आता दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीदरम्यान या नियमात सवलत देण्याचा विचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात नोंदणी केलेल्या अग्निवीरांना पत्र पाठवण्यात आल्याचाही दावा करण्यात येत आहे.

‘गरीब की बीबी सबकी भाभी’ वक्तव्यावरून गदारोळ; महापौरांच्या मध्यस्थीनंतरही वाद न शमल्याने ठाकरे गट सभागृहाबाहेर!

दरम्यान, 2022 मध्ये सुरू झालेल्या अग्निपथ योजनेनुसार अग्निवीरांची सुरुवातीची सेवा चार वर्षांची असते. त्यानंतर 25 टक्के अग्निवीरांची गुणवत्तेच्या आधारावर नियमित सेवेसाठी निवड केली जाते. उर्वरित पात्र अग्निवीरांना दोन वर्षांच्या ‘सेकंड टूर ऑफ ड्युटी’चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुक अग्निवीरांना एकूण सहा वर्षे सैन्यात सेवा बजावण्याची संधी मिळू शकते.

सोनिया गांधींच्या जन्मघरावर तिरंगा, आता संग्रहालयाची तयारी! काय आहे इटलीतील या ‘इंडियन हाऊस’चा इतिहास?

या निर्णयामागे प्रशिक्षित आणि अनुभवी मनुष्यबळ अधिक काळ सैन्यात उपलब्ध ठेवण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. सहा वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर अग्निवीरांना नियमित सैन्य भरतीसाठी पुन्हा संधी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अग्निपथ योजनेत सहभागी होणाऱ्या तरुणांचे वय साधारणतः 17.5 ते 21 वर्षे असते. चार वर्षांची सेवा पूर्ण होईपर्यंत त्यांचे वय 21 ते 25 वर्षांच्या दरम्यान पोहोचते. अशा परिस्थितीत अतिरिक्त सेवा कालावधीत विवाहाची परवानगी मिळाल्यास तरुणांना वैयक्तिक आयुष्याचे नियोजन करणे सोपे होऊ शकते. त्यामुळे अग्निवीरांच्या सेवाशर्तींमध्ये होणारा हा संभाव्य बदल महत्त्वाचा मानला जात आहे.

Exit mobile version