Download App

पाटण्यातून उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, ‘हुकूमशाहीच्या विरोधात लढू’

Opposition Parties Meeting: पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला शिवसेनेचे (UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित होते. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काश्मीरपासून कन्याकुमारपर्यंत सर्व लोक इथे जमले आहेत. आपली विचारधारा वेगळी असू शकते पण देश एक आहे. हा देश वाचवण्यासाठी आणि त्याची अखंडता टिकवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. लोकशाहीवर हल्ला करणाऱ्याला आपण विरोध करू. देशात कोणालाही हुकूमशाही आणायची असेल, आपण त्यांच्या विरोधात उभे राहू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटेल आहे.

सुरुवात चांगली झाली की भविष्यात चांगलीच होईल याची मला खात्री आहे. आपण भेटत राहू असे उद्धव ठाकरे म्हणाले. ममता बॅनर्जींच्या वक्तव्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, आपण विरोधक नाही, तर देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले की आम्ही 10 किंवा 12 जुलै रोजी शिमल्यात पुन्हा बैठक घेत आहोत. या बैठकीत आम्ही एक समान अजेंडा तयार करू. आम्हाला प्रत्येक राज्यात वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल.

Opposition Parties Meeting : मेहबूबांशेजारी उद्धव ठाकरे बसले की बसवले गेले?

ही विचारधारेचा लढाई
या बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भाजप आणि आरएसएस भारताच्या विचारधारेवर हल्ला करत आहेत. हा विचारधारेचा लढा असून आम्ही एकत्र आहोत. आम्ही ठरवले आहे की एकत्र काम करू आणि आपल्या विचारधारेचे रक्षण करू. विरोधी ऐक्याची ही प्रक्रिया पुढे जाईल.

Rahul Gandhi : संविधानावर भाजपसह संघाचं आक्रमण, विरोधकांच्या बैठकीतून राहुल गांधी बरसले…

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की पाटणा येथे झालेली बैठक चांगली झाली. आम्ही तीन गोष्टींवर भर दिला आहे. आम्ही एक आहोत, आम्ही एकत्र लढू, पुढील बैठक शिमल्यात होणार आहे. भाजपला इतिहास बदलायचा आहे आणि आम्हाला बिहारमधून इतिहास वाचवायचा आहे.

Tags

follow us