BJP च्या तानाशाहीपासून देशाला वाचवण्याासाठी आम्ही एकत्र; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

Uddhav Thackeray : अनेकांना वाटतं की आमची लढाई ही पक्षांसाठी किंवा कुंटूंबासाठी आहे. होय, आमची लढाई कुटूंबासाठीच आहे. हा देशच आमचं कुटूंब आहे आणि या देशाला सत्ताधारी पक्षाच्या तानाशाहीपासून वाचवण्याासाठी आम्ही एकत्र आलोय, असं विधान करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. (Uddhav Thackeray On BJP in Opposition […]

Uddhav Thackeray : आता ठाणेकरच गद्दारांना धडा शिकवतील

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : अनेकांना वाटतं की आमची लढाई ही पक्षांसाठी किंवा कुंटूंबासाठी आहे. होय, आमची लढाई कुटूंबासाठीच आहे. हा देशच आमचं कुटूंब आहे आणि या देशाला सत्ताधारी पक्षाच्या तानाशाहीपासून वाचवण्याासाठी आम्ही एकत्र आलोय, असं विधान करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. (Uddhav Thackeray On BJP in Opposition Party meeting in Bangalore)

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांच्या आघाडीच रणनीती ठरवण्यासाठी काही दिवसांपूर्वी पाटण्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर आज 26 पक्षांच्या नेत्यांची दुसरी बैठक पार पडत आहे. बंगळुर येथे ही बैठक सुरू आहे. या बैठकीला देशातील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी बोलतांना ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली. भाजपच्या तानाशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय, असं सांगत एकजुटीचा नारा त्यांनी दिला. भाजपला घाबरू नका, आम्ही सोबत आहोत, असंही यावेळी ते म्हणाले.

Opposition Party Meet : युपीएचं नावं ‘इंडिया’ ठेवलं, नव्या नावाचा विरोधकांना असा होणार फायदा 

उद्धव ठाकरे म्हणाले, आज विरोधकांची दुसरी बैठक यशस्वी झाली. आता देशातील जनता तानाशाहीच्या विरोधात उभी राहत आहे. काही लोकांना वाटतं आम्ही परिवारासाठी लढतोय. होय, आम्ही परिवारासाठी लढतो. हा देशच आमचा परिवार आहे. या परिवाराला आम्हाला सत्ताधारी पक्षाच्या तानाशाहीपासून वाचवायचं आहे. आमची ही लढाई केवळ एका पक्षाविरुध्द किंवा विचारसरणी विरुध्द नाही तर तर ही लढाई तानाशाही आणि नीती या विरोधातली आहे. आज सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांची मुस्कटदाबी केली जातेय. त्यामुळं स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याठी हा लढा आहे. सामान्य जनतेच्या मनात भाजपविषयी भीती आहे. पण आम्ही सोबत घाबरू नका, असंही ठाकरे म्हणाले.

Exit mobile version