गेल्या काही दिवसापासून सर्वात चर्चेचा विषय ठरलेला विषय म्हणजे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नक्की कोणाला मिळणार ? अखेर काल निवडणूक आयोगाने याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांची मोठी कोंडी केली आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक प्रश्न तयार झाले आहेत. समर्थकांना सांभाळून ठेवण्यासोबत लोकांपर्यंत पोहचणं, नवं नाव, नवं पक्ष घेऊन लोकांपर्यंत पोहचणं हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे.
पण उद्धव ठाकरे यांच्या या प्रकरणानंतर एका नावाची चर्चा चालू आहे, ते म्हणजे जगमोहन रेड्डी.
त्याच कारणही तसंच जगमोहन रेड्डी यांच्या वडिलांचं म्हणजे वाय एस रेड्डी मुख्यमंत्री पदावर असतांना त्यांच अपघाती निधन झालं. त्यानंतर काँग्रेसमध्ये जगनमोहन रेड्डी एकटे पडले, पक्षाने जगनमोहन रेड्डी यांना साथ दिली नाही. जगमोहन पक्षातून बाहेर पडले. राज्यभर पायी फिरले, कोर्टासमोर गेले, लढले, यशस्वी झाले. फक्त यशस्वी झाले असं नाही तर मुख्यमंत्री झाले. आंध्रातील आज त्यांच्याकडे १७५ पैकी १५१ आमदार आहेत.
हेही वाचा : Maharashtra politics : आदित्य ठाकरेंकडून फोटो ट्विट, निष्ठावंत म्हणाले…
२००९ हे वर्ष जगनमोहन यांच्या आयुष्याला कलाटणी देणार ठरलं. त्याच वर्षी त्यांचे वडील आंध्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर काँग्रेसनेही जगन यांना साथ दिली नाही. काँग्रेस वडिलांच्या जागी जगन यांचं राजकीय पुनर्वसन करेल अशी शक्यता वर्तवली जात होती पण तसं झालं नाही. पण जगनने हार मानली नाही.
नोव्हेंबर २०१० मध्ये काँग्रेसने एन. किरणकुमार रेड्डी यांना के.के. रोसैया यांच्या जागी आंध्रचे मुख्यमंत्री केले. मात्र त्या पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. जगन यांना डावलल्याची काँग्रेसला मोठी किंमत मोजावी लागली.
२९ नोव्हेंबर २०१० रोजी जगन यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि लोकसभेचा राजीनामा दिला. मार्च २०११ मध्ये जगन यांनी आपल्या नव्या पक्षाची म्हणजे वायएसआर काँग्रेसची स्थापना केली. हळूहळू राज्यात पक्षाचं स्थान मिळवण्यास सुरुवात केली. पक्षाची स्थापना केल्यांनतर झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत सत्ताधारी टीडीपीवर जगन यांना मात करता आली नाही, पण आपला संघर्ष त्यांनी सुरूच ठेवला.
हेही वाचा : शिवसेना आणि धनुष्यबाण दोन्ही एकनाथ शिंदे गटाचे : भाजपने ठाकरेंना पॉलिटिकली चिरडले
जगन मोहन यांनी काँग्रेस सोडून वायएसआर काँग्रेसची स्थापना केली तेव्हा काँग्रेसचे १८ आमदारही त्यांच्यासोबत आले होते. यामुळे त्या १८ जागांवर पोटनिवडणूक झाली, ज्यामध्ये वायएसआर काँग्रेसने १५ जागा जिंकल्या. मात्र दरम्यानच्या काळात जगन मोहन यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी तब्बल १६ महिने तुरुंगात राहावे लागले.
आंध्र प्रदेशमध्ये २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जगन मोहन यांच्या पक्षाला फारसे यश मिळाले नाही. यानंतर जगन मोहन यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात ३६४८ किलोमीटरची पदयात्रा केली. त्याचा फायदा त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मिळाला आणि त्यांचा पक्षाने १५१ जागा जिंकल्या आणि जगन मोहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.
हेही वाचा :Press Conferance : उद्धव ठाकरे चिडले : कौरव, शेण खाल्ले, मोगलाई, नामर्द, चोर…
जगनमोहन रेड्डी आज आंध्रातील सर्वात मोठे नेते आहेत. त्यांचा पक्ष वायएसआर कॉंग्रेस हा सर्वात शक्तिशाली पक्ष आहे. पण १० वर्षांपूर्वी त्यांची परिस्थिती काय होती? पक्ष सोडला, सत्ता गेली, पण ते लढले आणि जिंकले. आज ठाकरे परिवाराची परिस्थितीही तशीच आहे.
शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. ठाकरे यावर कोर्टात जातील. पण कोर्टाबाहेर जनतेच्या कोर्टात ठाकरे उतरणार का? लढणार का? आणि जिंकणार का? असा प्रश्न आहे.