Press Conferance : उद्धव ठाकरे चिडले : कौरव, शेण खाल्ले, मोगलाई, नामर्द, चोर…
मुंबई : ‘बाळासाहेबांचे विचार त्यांना कधी समजलेच नाही. कारण बाळासाहेबांनी कधीच कुणाचे गुलाम व्हा हा विचार दिला नव्हता. त्यांनी अन्यायाशी लढा अन्यायावर लाथ मारा असे शिकवण दिली. मी ती त्यावेळी मारली त्यामुळे आम्ही अंधेरीची पोट निवडणूक जिंकली. ती तुम्ही का लढवली नाही. दुसऱ्यांचा नेता चोरायचा दुसऱ्यांचे विचार चोरल्यासारखं दाखवायचं दुसऱ्याच चिन्ह चोरायचं आणि जिंकलो की नाही असं म्हणायचं मात्र ते जिंकू शकत नाहीत मात्र त्यांना हे कळून चुकलेला आहे की बाळासाहेबांनी शिवसेना याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत कारण ज्याप्रमाणे सभेमध्ये एकेकाळी लोक मोदींचे मुखवटे घालून यायचे त्याप्रमाणे त्यांना बाळासाहेबांचे मुखवटे घालून लोकांसमोर फिरावे लागते पण मुखवटे घालून विचार विचार येत नाहीत.’
हा सरळ अन्याय आहे. आम्ही सर्व कागदपत्र सादर केले तरी देखील केवळ आमदार आणि खासदारांच्या जोरावर पक्ष कोणाकडे आहे ? हे ठरणार असेल तर आम्हाला इतके दिवस कागदपत्र सादर करायला का लावली ? आयोगानं आज शेण खाल्लं मग हा खटाटोप कशासाठी ? त्यामुळे केंद्र सरकारच्या गुलाम असलेल्या निवडणुका आयोग आमचं मशाल हे चिन्ह देखील काढून घेऊ शकतील. पण शिंदे घटना ही सगळी चोरी केली त्यामध्ये कोणती मर्दानगी आहे ? असे सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Uddhav Thakeray : देशातील लोकशाही संपली… पंतप्रधानांनी हुकुमशाही घोषीत करावी!
केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपने साथ दिली. शिंदे यांचा वापर करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कोंडीत पकडले. आता पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही शिंदेंकडे गेल्याने ठाकरे यांन राजकीयदृष्ट्या धक्का देण्यात भाजपला यश आले आहे. राजकीयदृष्ट्या बुलडोझरच फिरविण्यात आल्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.
राज्याच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन राज्यात नवं सरकार स्थापन केलं होते. दरम्यान, सत्तास्थापनेनतंर शिवसेना कुणाची? हा वाद उफाळून आला होता. या निर्णयावर शिवसेनेने आक्षेप घेतला असून सत्यमेव जयते ऐवजी असत्यमेव जयते, असे म्हणावेसे वाटते, अशी प्रतिक्रिया पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
त्यानंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिलं आहे.दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर काय परिणाम होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.