Download App

धक्कादायक! UGC NET 2024 परीक्षेचा पेपर फक्त 5 हजारातच फुटला

UGC NET 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालानंतर देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या UGC-NET परीक्षा अखेर केंद्र

  • Written By: Last Updated:

UGC NET 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालानंतर देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या UGC-NET परीक्षा अखेर केंद्र सरकारने (Central Government) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांकडून पेपर फुटीचा आरोप करण्यात आला होता.

सध्या या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) होत असून सरकारने मोठा निर्णय घेत या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे.

दुसरीकडे या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. परीक्षा माफियांनी परीक्षेच्या एक दिवसापूर्वी पेपर लीक करून त्याला टेलिग्रामच्या (Telegram) माध्यमातून संपूर्ण देशात पसरवला. त्यानंतर कोचिंग इन्स्टिट्यूटच्या (Coaching Institute) माध्यमातून प्रत्येकी 5 हजार रुपयांना विद्यार्थ्यांना पेपर विकला असल्याची माहिती मिळाली आहे.

तर संपूर्ण देशात पेपर व्यवस्थित पार पडल्याचा दावा एनटीएकडून करण्यात आला होता मात्र जेव्हा टेलीग्रामवर आलेला पेपर आणि यूजीसी-नेटच्या पहिल्या शिफ्टचा पेपर सारखाच दिसून आल्याने सर्वांना धक्का बसला. यानंतर शिक्षण मंत्रालय आणि एनटीएकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र तोपर्यंत पेपरफुटीची माहिती यूजीसीपर्यंत पोहोचली होती. माहितीनुसार देशातील अनेक शहरात प्रत्येकी पाच हजार रुपयांमध्ये या पेपरची विक्री झाली अशी माहिती समोर आली आहे.

या धक्कादायक घटनेनंतर आता शिक्षण मंत्रालयाने सायबर एजन्सीसह इतर एजन्सींना आगामी परीक्षांबाबत सतर्क केले आहे अशी माहिती UGC-NET पेपर लीक प्रकरणावर लक्ष ठेवणाऱ्या उच्चपदस्थ सूत्रांनी माध्यमांना दिली आहे. मात्र या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना पेपर विक्रीची माहिती कोणत्या शहरात आणि कधी मिळाली यांची माहिती त्यांनी दिलेली नाही.

पदवीधर निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप? अनिल परबांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे काहीही बोलण्यास तपासावर परिमाण होईल असं तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

क्रिकेट विश्वात शोककळा! माजी भारतीय वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सनचा निधन

follow us

वेब स्टोरीज