पदवीधर निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप? अनिल परबांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

पदवीधर निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप? अनिल परबांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Anil Parab On Election Commission : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची (Legislative Council Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. यातच आता शिवसेनाचे (ठाकरे गट) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आयोगावर गंभीर आरोप केले आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये अनिल परब म्हणाले की, आम्ही काही वर्षांपासून निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारभाराबद्दल बोलत आहोत. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे मात्र कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधली आहे का? असा आम्हाला प्रश्न पडत आहे. काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) देखील ताशेरे ओढले होते.

निवडणुकीत निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या आदेशावरून काम करत आहे असं दिसत असल्याचा आरोप देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला.  या निवडणुकीत आयोग म्हणतं की, तुम्ही जास्त नोंदणी करा आणि आम्ही जास्त नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्ही हजारो नावांची नोंदणी केली होती, तेव्हा ते चेक केल जातं आणि मग आम्हांला स्लिप दिली जाते आणि जेव्हा अर्ज नाकारले जातात तेव्हा ते तिकडेच परत दिले जातात तसेच काही कारण असतील तर ते सांगितली जातात लगेच. मात्र यावेळी आमच्या पक्षाची नावं ठरवून बाद केली जात आहेत आणि भाजपकडून नोंदवलेली नावं कायम आहेत असा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगावर केला आहे.

अनिल परब पुढे म्हणाले, हा संपूर्ण घोळ आपल्यासमोर आणण्यापूर्वी आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. तिथे कुलकर्णी नावाचे अधिकारी आणि कलेक्टर होते त्यांच्या समोर आम्ही आमची बाजू मांडली असून त्यांना आम्ही आमचा अर्ज नाकारण्यामागील कारण देखील विचारले आहे.

क्रिकेट विश्वात शोककळा! माजी भारतीय वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सनचा निधन

मतदानासाठी फक्त चार – पाच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे सर्वांना मतदान करायला मिळावा अशी मागणी आम्ही त्यांच्यासमोर केली असल्याची माहिती देखील अनिल परब यांनी यावेळी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज