Download App

Budget 2024 : प्राप्तिकर मर्यादा जैसे थे! लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही सर्वसामान्यांची निराशाच

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. हा अर्थसंकल्प अंतरिम असला तरी, यात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवत अनेक घोषणा केल्या आहेत. यातील सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे प्राप्तिकर सवलत जैसे थे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांसाठी ही घोषणा काहीशी निराश करणारी मानली जात आहे. (Union Finance Minister Nirmala Sitharaman announced no changes in the income tax rates in presenting her sixth consecutive Budget)

Budget 2024 मध्ये महिलांसाठी मोठी घोषणा! 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार

2023 च्या शेवटच्या संपूर्ण अर्थसंकल्पात सीतारामन यांनी मध्यमवर्गाला उद्देशून वैयक्तिक प्राप्तिकर सवलतीत अनेक बदल केले होते. यानुसार सवलत मर्यादा पाच लाख रुपयांवरून सात लाख रुपये करण्यात आली होती. सध्या सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी ही मर्यादा वाढवून नऊ लाख केली जाईल अशी आशा नोकरदार आणि कर भरणाऱ्यांना होती. मात्र, सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरात कोणताही बदल करण्या आलेला नाही.

अंगणवाडी सेविकांसाठी अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

अंगणवाडी सेविकांसाठी अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. अंगणवाडी सेविकांसाठी आयुष्मान भारत हेल्थ कव्हर सर्व आशा, अंगणवाडी सेविकांसाठी वाढवण्यात आले आहे. याशिवाय सध्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांचा वापर करून आम्ही अधिक वैद्यकीय महाविद्यालये निर्माण केले जाईल असे सीतारामन यांनी सांगितले.

सरकार 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार

सरकार 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे. आतापर्यंत 2 कोटी महिला लखपती बनल्या असून, येणाऱ्याकाळात 3 कोटी महिलांना लखपतीदीदी बनवण्याचे लक्ष्य असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. नऊ कोटी महिलांचा समावेश असलेल्या 83 लाख बचत गटांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यामुळे एक कोटी महिलांना लखपती दीदी बनण्यास मदत झाली आहे.

follow us