Download App

पैशांसोबत पत्नी अन् मुलांचा सेल्फी; पोलीस अधिकाऱ्याला पडला महागात

Viral News : सोशल मीडियावर (Social media)अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यात काही चांगल्या असतात तर काही अनेकांना अडचणीत आणणाऱ्या असतात. असंच काहीतरी एका पोलीस अधिकाऱ्यासोबत घडलं आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाने काढलेला एक सेल्फी (Selfie)त्यांच्यासाठी चांगलाच महागात पडला आहे. झालं असं की, उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) उन्नावमधील (Unnao)एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी नोटांच्या बंडलसह सेल्फी काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हा सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर मात्र संबंधित पोलीस अधिकारी चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याची तात्काळ बदली करुन पोलीस चौकशी (Police investigation)लावण्यात आली आहे.(unnao selfie viral police officers wife and children with bundles of notes)

Buldhana : महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही; फडणवीसांची ‘समृद्धी’ला क्लिनचीट!

उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्याच्या बेहता मुजावर पोलीस ठाण्याचे प्रभारी रमेश चंद्र साहनी (Ramesh Chandra Sahni)यांच्या पत्नी आणि दोन मुलांनी 500-500 च्या नोटांचे बंडल असलेला सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. हा सेल्फी व्हायरल होताच पोलीस अधीक्षकांनी त्याची दखल घेत रमेशचंद्र साहनी यांना खुलासा मागितला आहे.

पाकिस्तानचा नवा ड्रामा! भारतात येण्याआधीच घाबरला, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

व्हायरल झालेल्या सेल्फीमध्ये तब्बल 27 नोटांचे बंडल दिसत आहेत. त्यात 14 लाख रुपयांसोबत पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि दोन मुलं पोज देताना दिसत आहेत. नोटांबरोबरचा हा सेल्फी व्हायरल झाल्याने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.

व्हायरल झालेल्या सेल्फीवर रमेशचंद्र साहनी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, हा सेल्फी ज्यावेळी आपली मालमत्ता विकली होती, तेव्हाचा आहे. हा सेल्फी 14 नोव्हेंबर 2021 रोजी काढल्याचे साहनी यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Tags

follow us