Buldhana : महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही; फडणवीसांची ‘समृद्धी’ला क्लिनचीट!

Buldhana : महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही; फडणवीसांची ‘समृद्धी’ला क्लिनचीट!

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही. आतापर्यंत जेवढे काही अपघात घडले, त्यात कुठेही रस्त्याच्या बांधकामामुळे घटना घडल्याचं कुठेही निदर्शनास आलेलं नाही, असं म्हणतं बुलढाणा जिल्ह्यातील बस दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू रस्त्यांच्या निकृष्ट दर्जामुळे झाला असल्याची शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली. ते माध्यमांशी बोलत होते. (Devendra Fadnavis ruled out poor quality of roads as being responsible for the bus accident in Buldhana district of the state in which 26 people died)

फडणवीस म्हणाले, समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. समृद्धी महामार्ग पूर्णतः सुरक्षित आहे. आतापर्यंत जे काही अपघात घडले, त्यात कुठेही रस्त्याच्या बांधकामामुळे घटना घडल्याचं कुठेही निदर्शनास आलेलं नाही. कुठे मानवी चुका तर कुठे वाहनाची तांत्रिक कारण समोर आली आहेत. पण आम्ही अशा घटना टाळण्यासाठी पावले उचलत आहोत. आम्ही कॅमेरे आणि स्मार्ट सिस्टीम बसवण्याचा विचार करत आहोत, पण त्यासाठी वेळ लागेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भीषण अपघातात 26 जण ठार :

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बस डिव्हायडरला धडकून डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला आणि 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने 8 जणांचा जीव वाचला असून ते सर्व किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर सिंदखेडराजा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत :

दरम्यान, या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये बसने पेट घेतल्यानं 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण या अपघाताबद्दल जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. याशिवाय अपघातामधील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube