Download App

पाकिस्तानात पाठवायचा भारतीय शस्त्रास्त्रांची गुप्त माहीती; आयएसआयचा गुप्तहेर युपी एटीएसच्या ताब्यात

UP ATS ने आज शुक्रावार, 14 मार्च 2025 ला एक मोठी कारवाई केली आहे.

UP ATS Arrest ISI spy who sent Secret of ordinance factory to Pakistan : उत्तर प्रदेश एटीएसने आज शुक्रावार, 14 मार्च 2025 ला एक मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथून युपी एटीएसने एका पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय एजंटला ताब्यात घेतलं आहे. धक्कादाक म्हणजे हा एजंट थेट भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्र निर्मितीची माहिती पाकिस्तानात पाठवत होता.

शिंदेंच्या शिलेदाराची हत्या! हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या, पंजाबमधील धक्कादायक घटना

रविंद्र कुमार असं या एजंटचं नाव आहे. तो सध्या फिरोजाबाद जिल्ह्यात असेलेल्या भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्र निर्मिती कंपनी म्हणजे ऑर्डिनन्स फॅक्ट्रीचा चार्जमन म्हणून कार्यरत आहे. तो आयएसआयच्या हनि ट्रॅपमध्ये अडकला होता. ज्याद्वारे त्याच्याकडून ऑर्डिनन्स फॅक्ट्रीची विविध प्रकारची गुप्त माहीती महिला गुप्तहेरांना पाठवत होता.

चार हजार स्काइप आयडी अन् 83 हजार व्हॉट्सअप बंद; ‘डिजिटल अरेस्ट’ विरुद्ध सरकारची कारवाई

एटीएस एडीजी नीलाब्जा चौधरी यांनी या प्रकऱणाची माहीती दिली. त्यांनी सांगितलं की, रविंद्र कुमार पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने टाकलेल्या हनि ट्रॅपमध्ये अडकला होता. ज्याद्वारे त्याच्याकडून ऑर्डिनन्स फॅक्ट्रीची विविध प्रकारची गुप्त माहीती महिला गुप्तहेरांना पाठवत होता. ही महिला त्याच्याशी नेहा शर्मा म्हणूव बोलत होती. ती त्याला फेसबुसवर भेटली होती. अनेक वर्षांपूर्वी त्यांची मैत्री झाली होती. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये ऑर्डिनन्स फॅक्ट्रीची विविध प्रकारची गुप्त माहीती पाठवण्यात आल्याचे आढळून आले आहे.

यामध्ये तो ऑर्डिनन्स फॅक्ट्रीचा दररोजचा रिपोर्ट या महिलेला पाठवायचा ज्यामध्ये ड्रोन, गगनयान प्रोजेक्ट आणि उतर गुप्त माहिती, स्क्रिनिंग कमिटीचे कॉन्फिडेंशिअल लेटर, अशी सर्व माहिती या महिलेला पाठवायचा. तसेच या महिलेने बोलातना आपण पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेसाठी काम करत असल्याचं सांगितलं. तरी देखील पैशांच्या लालचेने रविंद्र कुमार ही माहीती पाठवतच राहिला. अखेर त्याला उत्तर प्रदेशमधील आग्रा येथून युपी एटीएसने ताब्यात घेतलं आहे.

follow us