Download App

अखिलेश यादवांनी आता लालू यादवांचीही भेट घेतली, राजकीय चर्चांना उधाण…

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी गुरुवारी दिल्लीत राजदचे प्रमुख लालू यादव यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. अखिलेश यादव आणि लालू यादव यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

ही तर अमित शाहांची सरळ धमकीच ! काँग्रेसची बाजू घेत राऊतांचा भाजपवर हल्ला

अखिलेश यादव लालू यादव यांची मीसा भारती यांच्या घरी भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली आहे. अखिलेश यादव यांनी या भेटीत लालू यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. या भेटीनंतर अखिलेश यादव यांनी भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर करताना त्याचे ‘कुशलक्षेम बैठक’ असं कॅप्शनही दिलं आहे.

Styapal Malik : मोदींवर गंभीर आरोप करणाऱ्या मलिकांना राऊत भेटणार

दरम्यान, राजकीय वर्तुळात या बैठकीला विरोधी एकजुटशी जोडले जात असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच मार्च महिन्यात अखिलेश यादव पत्नीसह लालू यादवांना भेटायला आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना जाऊन विरोधी ऐक्याचा मेसेज दिला होता.

नवउद्योजकांना सुवर्णसंधी, चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाऊंडेशनतर्फे परवाना मेळावा

त्यांनी भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यासाठी नितीश कुमार यांनी दिल्लीतील राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.

दरम्यान, नितीश कुमार 25 एप्रिल रोजी लखनौमध्ये होते, तिथे त्यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली. यावेळी लालू यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे नितीश यांच्यासोबत उपस्थित होते. यापूर्वी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. आता अखिलेश आणि लालू यादव यांच्या भेटीने भाजपविरोधात युतीची चर्चा अधिक तीव्र झाल्याचं दिसून येत आहे.

Tags

follow us