Styapal Malik : मोदींवर गंभीर आरोप करणाऱ्या मलिकांना राऊत भेटणार
Sanjay Raut Meet to Styapal Malik : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले होते. ‘द वायर’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले. त्यांच्या या दाव्यांनंतर देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या दाव्यांवरून आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
मलिकांनी दिलेल्या मुलाखतीत मलिकांनी “पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलून या प्रकरणावर जास्त न बोलण्याची सूचना केली होती. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी मौन बाळगण्यास सांगितले होते.” असा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे देशभरात मोठी खळबळ माजली होती. बिहार, जम्मू-काश्मीर, गोवा आणि मेघालय अशा राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल पदावर असताना केंद्र सरकारवर टीका केली होती.
दरम्यान आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सध्या दिल्लीमध्ये आहेत. यावेळी ते याच सत्यपाल मलिक यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 12 वाजता दिल्लीत ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. मलिक यांनी मुंबई दौऱ्याचं निमंत्रण राऊत देणार आहेत. तर या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरेंना भेटावं असं देखईल ते सांगणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Satyapal Malik : सत्यपाल मलिक पोलिसांच्या ताब्यात, राज्यपाल असतांना मलिक गप्प का होते? शाहांचा सवाल
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या भेटीला महत्त्व आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ‘द वायर’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल अनेक धक्कादायक दावे केले होते. त्याचबरेबर त्यांनी कश्मीरमध्ये एका विमा योजनेत घोटाळा झाल्याचे देखील आरोप केले होते. त्यांनंतर त्यांना चौकशी यंत्रणांचं त्यांना बोलावणं देखील आलं होतं. याच मुद्द्यांवर आजची ही सत्यपाल मलिक आणि संजय राऊत यांची भेट असणार आहे. त्यामुळे या भेटीतून काय साध्य होत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
पुलवामा हल्ल्याच्या वेळी राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री होते. सीआरपीएफने आपल्या जवानांसाठी विमान मागितले होते, परंतु गृह मंत्रालयाने नकार दिला. त्यानंतर सीआरपीएफने ज्या रस्त्यावरून जवानांना पाठवले त्याचा तपास केला नाही. या हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलून या प्रकरणावर जास्त न बोलण्याची सूचना केल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे