नवउद्योजकांना सुवर्णसंधी, चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाऊंडेशनतर्फे परवाना मेळावा

  • Written By: Published:
नवउद्योजकांना सुवर्णसंधी, चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाऊंडेशनतर्फे परवाना मेळावा

A Golden Opportunity For New Entrepreneurs : यशवंतराव चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील नवउद्योजकांच्या व्यवसायांना नवी दिशा देण्यासाठी खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व आधीपासूनच व्यवसायात असणाऱ्या युवक युवतींसाठी ही एक अनोखी सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त उद्योजकांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

याअंतर्गत उद्योग, व्यवसायासाठी लागणारे परवाने काढून देण्यासाठी धायरी येथे एका खास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सुळे यांनी दिली. याद्वारे आपल्या उद्योग व्यवसायाला नवी दिशा देण्याची मोठी संधी पुण्यातल्या उद्योजकांना मिळणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून उद्यम, एमएसएमई रजिस्ट्रेशन, एफएसएसएआय रजिस्ट्रेशन, शॉप ऍक्ट आणि ट्रेडमार्क मिळवून देण्यात येणार आहे.

व्यावसायिकांना या विविध परवान्यांची नितांत गरज असते. हे सर्व परवाने यशवंतराव चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाउंडेशनच्या माध्यमातून सुलभपणे मिळवता येतील. त्याचबरोबर छोट्या उद्योजकांना यासाठी खास सवलतही देण्यात येणार आहे.

परवाने आणि इतर गोष्टींकडे उद्योजक फारसे लक्ष देत नाहीत. परिणामी नंतर उद्योग वाढविण्यासाठी, कर्ज मिळविण्यासाठी परवाने नसणे हे त्यांच्यासाठी मोठा अडसर ठरते. हे टाळायचे असेल, व्यवसायात मोठी झेप घ्यायची असेल तर केवळ पारंपरिक मार्गाने न जाता त्यात बदल करत, नव्या गोष्टी शिकत पुढे जाण्याची गरज आहे. त्यामुळे उद्योजकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार सुळे यांनी केले आहे.

भाजप महाराष्ट्राची माती करायला निघालंय, संजय राऊतांचे टीकास्त्र

‘देआसरा फाउंडेशन’ हे ना नफा तत्वावर गेल्या १० वर्षांपासून उद्योजकांच्या मदतीसाठी काम करत असून आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त उद्योजकांना त्याचा लाभ झाला आहे. समाजात उद्योजकता वाढावी, नवे रोजगार निर्माण व्हावेत, हे फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे. या उद्देशानेच प्रख्यात सॉफ्टवेअर कंपनी पर्सिस्टंट सिस्टिम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी देआसरा फाउंडेशनची स्थापना केली आहे, असे त्या।म्हणाल्या.

धायरी येथील बंडुजी खंडोजी चव्हाण महाविद्यालय, धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी याठिकाणी येत्या बुधवारी (दि. ३ मे) सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत हा मेळावा होणार असून अधिक माहितीसाठी ९९२१५७२७७० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube