Download App

UPI down : गुगल पे, फोन-पे सेवा विस्कळीत, ऑनलाईन पेमेंट करताना युजर्संना अडचणी

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस सेवा आज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. त्यामुळं गुगल पे, फोन पे च्या युजर्संना व्यवहार करताना अडचणी आल्या.

  • Written By: Last Updated:

UPI down : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा आज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यामुळं गुगल पे (Google Pay) फोन पे (Phone Pay) च्या अनेक युजर्संना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागला. या वर्षी UPI सेवांमध्ये व्यत्यय येण्याची ही चौथी वेळ आहे.

UPI down : गुगल पे, फोन-पे सेवा विस्कळीत, ऑनलाईन पेमेंट करताना युजर्संना अडचणी 

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही भारतातील सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्रणाली आहे. भारतातील लाखो लोक या प्रणालीचा ऑनलाईन व्यवहारांसाठी वापर करतात. मात्र, आज (7 ऑगस्ट) संध्याकाळी गुगल पे, फोन-पे आणि पेटीएम या लोकप्रिय यूपीआय ॲप्सच्या सेवांमध्ये अडथळे आले. संध्याकाळी ७.४५ वाजल्यापासून, युजर्संना गुगल पे, फोनपे, पेटीएम आणि इतर प्रमुख प्लॅटफॉर्मवर व्यवहार पूर्ण करता येत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या.

रात्री ८.३० वाजेपर्यंत, डाउनडिटेक्टर वेबसाइटवर सुमारे २,१४७ तक्रारी नोंदवल्या गेल्या. त्यापैकी ८० टक्के तक्रारी पेमेंटशी संबंधित समस्यांशी संबंधित होत्या. या तांत्रिक बिघाडामुळे एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्रा यासारख्या प्रमुख बँकांद्वारे होणाऱ्या व्यवहारांवरही परिणाम झाला.

सरकारविरोधात कोणीही लढणार नाही, शरद पवार हे BJP चे हस्तक; आंबेडकरांचा आरोप 

दरम्यान, फिनटेक फर्म फी कॉमर्सच्या अहवालानुसार, भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात UPI चे वर्चस्व कायम आहे आणि २०२४ मध्ये सुमारे ६५ टक्के व्यवहार UPI द्वारे केले गेले.

यापूर्वीही युपीआय सेवांमध्ये व्यत्यय
26 मार्च 2025: यूपीआय सर्व्हर संध्याकाळी 7 वाजता डाउन झाले होते, त्यामुळं हजारो वापरकर्त्यांना पेमेंट करण्यात अडचण आली होती.

2 आणि 12 एप्रिल 2025: एका आठवड्यात दोनदा यूपीआय सेवा ठप्प झाली होती. डाउनडिटेक्टरनुसार, 12 एप्रिलला दुपारी 12 वाजल्यापासून यूपीआय डाउन झाले होते.

16 एप्रिल 2025: 16 एप्रिल देखील यूपीआय क्रॅश झाले होते. त्यामुळं युजर्संना अडचणींचा सामना करावा लागला होता.

follow us