Download App

यमुना एक्स्प्रेस वेवर बसची ट्रकला धडक; 5 ठार, 15 हून अधिक जण जखमी

  • Written By: Last Updated:

Bus Collides With Truck On Yamuna Expressway : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलीगडमध्ये भीषण रस्ता अपघात झाला आहे. यमुना एक्सप्रेस वेवर बसने ट्रकला जोरदार धडक (Accident News) दिली. या अपघातात बसमधील 5 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 15 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना बसमधून बाहेर काढून स्थानिक रुग्णालयात दाखल केले.

बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अयोध्येच्या कृष्णा ट्रॅव्हल्सची दिल्लीहून मऊकडे जाणारी ड Yamuna Expressway बल डेकर खासगी बस अलीगढजवळील यमुना एक्सप्रेसवे क्रमांक 56 वर बिअरच्या बाटल्यांनी (Bus Collides With Truck) भरलेल्या भंगार ट्रकला मागून धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, बस चक्काचूर झाली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांमध्ये पाच महिन्यांचे बालक, एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. मृतांपैकी तिघांची ओळख पटली आहे, तर दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही.

आर्थिक लाभ होणार, व्यवसायात नवीन संधी मिळणार; एका क्लिकवर वाचा आज तुमच्या राशीत काय लिहिलंय

या अपघातात 15 जण जखमी झाले असून त्यात एक 11 महिन्यांचे बाळ, एक लहान मुलगी, एक पाच वर्षांचे बालक, तीन महिला आणि नऊ पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर बसमध्ये प्रवास करणारे लोक खिडक्या तोडून बाहेर आले. अपघातामुळे अनेक मृतदेह बसमध्ये अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करत सर्व जखमींना बसमधून बाहेर काढले.

‘चक दे इंडिया’ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा भारतात, चीनचा 1-0 ने उडवला धुव्वा

पोलिसांनी सर्व जखमींना जेवर येथील कैलास रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताचे मुख्य कारण वेग आणि बेदरकारपणा असल्याचे मानले जात आहे. ही डबल डेकर बस प्रवाशांना घेऊन दिल्लीहून मऊकडे निघाली होती. बसचा चालक वेगाने गाडी चालवत होता आणि समोरून ट्रक पाहून वेळेत ब्रेक लावू शकला नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृतांच्या कुटुंबीयांना माहिती दिली जात आहे.

 

follow us