UP Assembly Elections : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर देशात जानेवारी – फेब्रुवारी 2027 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. या पाचही राज्यात कोण बाजी मारणार याकडे देशाचे लक्ष लागून असताना एक मोठी अपडेट आता समोर येत आहे. या पाचही राज्याचे निवडणुका ऑक्टोबर- नोव्हेंबर 2026 मध्ये होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. तर दुसरीकडे याबाबत कोणत्याही सूचना केंद्र सरकारकडून मिळाल्या नसल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून याबाबत अद्याप सूचना मिळालेली नाही. तरीही, जर निवडणुका (UP Assembly Elections) नोव्हेंबरमध्ये घेतल्या गेल्या, तर ‘विशेष सारांश पुनरावलोकन’ (SSR) आणि मतदार याद्यांबाबतच्या समस्या उद्भवणार नाहीत कारण संबंधित राज्यांमध्ये एसएसआर प्रक्रिया आधीच अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गरज पडल्यास, साधारणपणे जानेवारीत प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी तीन महिने आधीच निश्चित केली जाऊ शकते, मात्र यासाठी सरकारच्या निर्देशांची प्रतीक्षा करावी लागेल असं निवडणूक आयोगाकडून (Election Commission) सांगण्यात येत आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका का ?
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2027 मध्ये नियोजित असणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 9 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणारा जनगणनेचा दुसरा टप्पा एकाच वेळी होत असल्याने दोन्ही प्रक्रियांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागणार आहे. निवडणुका घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असते मात्र याच वेळी देशात जनगणनेचे काम सुरु असल्याने मोठ्या संख्येने कर्मचारी उपलब्ध होणार नाही त्यामुळे पाच ही राज्यात ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेण्याची तयारी केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील भाजपच्या राज्य शाखांनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याबाबत चर्चा झाल्याचे मान्य केले आहे आणि या राज्यांमध्ये पक्षाने निवडणुकीच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यास सुरुवात केल्याचे संकेत दिले आहेत.माहितीनुसार, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी निवडणुका होऊ घातलेल्या पाचही राज्यांमधील नेते, प्रभारी आणि पदाधिकाऱ्यांना या महिन्यातच निवडणुकीची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
अर्थखात्याचा कारभार सांभाळू शकणारे महायुतीत अनेक नेते; संजय राऊतांना CM फडणवीसांचं प्रत्युत्तर
नोव्हेंबर-डिसेंबर 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज राहणे, बूथ समित्या अंतिम करणे आणि संघटनात्मक नियुक्त्या पूर्ण करणे अशा सूचना पक्षाने दिल्या आहेत. तसेच, निवडणुकीची तयारी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
