अर्थखात्याचा कारभार सांभाळू शकणारे महायुतीत अनेक नेते; संजय राऊतांना CM फडणवीसांचं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis On Sanjay Raut : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधानानंतर राज्याचे अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
Devendra Fadnavis On Sanjay Raut : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधानानंतर राज्याचे अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने या खात्यावरुन गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये अनेक घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे. अर्थखाते मिळत नसल्याने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावे अशी मागणी देखील मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे अर्थ खातेवरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांनी भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) टोला लावला आहे.
अर्थखाते फडणवीसांकडे ठेवण्यातच राज्याचे शहाणपण आहे कारण सध्या हे खाते सांभाळेल असा एकही सक्षम नेता दिसत नाही असं माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. तर आता त्यांच्या प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
हे शेवटचे प्रमाणपत्र होते, ज्याची मला आवश्यकता होती. मला असे वाटते की आमच्या महायुतीत अनेक नेते आहेत, जे अर्थखात्याचा कारभार सांभाळू शकतात. सध्या अर्थखाते माझ्याकडे आहे. भविष्यात काय करायचे, ते पुढे पाहू असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत ?
कोणाला कोणते खाते द्यावे आणि कोणते खाते आपल्याकडे ठेवावे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पण अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडे ठेवणे यातच शहाणपण आहे. राज्यातल्या घडामोडी पाहता अर्थखातं सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही. त्यामुळे हे खाते मुख्यमंत्र्यांकडे असणे यातच राज्याचे शहाणपण आहे असं माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते.
बैठकीपुर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का, शिर्डीचे खासदार वाकचौरे नॉटरिचेबल; ऑपरेशन टायगरची चर्चा