बैठकीपुर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का, शिर्डीचे खासदार वाकचौरे नॉटरिचेबल; ऑपरेशन टायगरची चर्चा
Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु असताना
Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु असताना आज ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (14 जून) मातोश्री वर पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलवली आहे मात्र या बैठकीपूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे अचानक नॉट रिचेबल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार वाकचौरे अचानक नॉट रिचेबल झाल्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 7 खासदार ऑपरेशन टायगरअंतर्गत (Operation Tiger) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील सर्व खासदारांना उपस्थितीत राहण्याचे आदेश दिले आहे. आज दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या बैठकीत पक्षांतर्गत रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर दुसरीकडे या बैठकीपूर्वी खासदार वाकचौरे (Bhausaheb Vakchaure) यांचा फोन बंद असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
माहितीनुसार, खासदार वाकचौरे हे गेल्या दोन दिवसांपासून कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले आहेत. त्यांच्या घरी सध्या कोणीही नसून त्यांचे स्वीय सहाय्यक देखील त्यांच्यासोबत नसल्याने ते नेमके कुठे गेले आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
शेतकऱ्यांनो, मुंबईसह महाराष्ट्रात ‘या’ दिवशी दाखल होणार मान्सून; जाणून घ्या सर्वकाही-
राज्यातील राजकारणात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
तर दुसरीकडे राज्यातील राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा जोराने सुरु आहे. ठाकरे गटाचे लोकसभेतील 9 पैकी 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. या चर्चांमुळे उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर बैठक बोलावली असल्याची माहिती समोर येत आहे.