Elections 2024 : महाराष्ट्राप्रमाणेच झारखंड राज्यातही विधानसभेसाठी मतदान पार पडलं. तसेच उत्तर प्रदेशातील नऊ मतदारसंघातही पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. मात्र या निवडणुकी मतदाना दरम्यान अनेक ठिकाणी जोरदार राडा झाल्याचे दिसून आले. या ठिकाणी निवडणूक आयोगाने मिळालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
उत्तर प्रदेशातील नऊ मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. यावेळी मात्र अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचे दिसले. समाजवादी पार्टीने भाजपवर अनेक गंभीर आरोप केले. मिळालेल्या माहितीनुसार मतदारांनी तपासण्यासाठी आणि निवडणुकीच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल
निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले की कोणत्याही पात्र मतदाराला मतदानापासून रोखता येणार नाही. मतदाना दरम्यान कोणतीही भेदभावपूर्ण वर्तणूक सहन केली जाणार नाही. तक्रार मिळताच तत्काळ कारवाई करण्यात येईल. जर या चौकशीत कुणी दोषी आढळून आला तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद, कटेहरी, खैर, कुंदरकी, करहल, मजवा, मीरापूर, फुलपूर, सिसामऊ या नऊ विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुका होत आहेत.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आलेल्या सात पोलीस कर्मचाऱ्यांत प्रत्येकी दोन कानपूर आणि मुजफ्फरनगर जिल्ह्यांतील आहेत. तीन कर्मचारी मुरादाबाद जिल्ह्यातील आहेत. सर्व तक्रारींची दखल घ्या आणि तत्काळ कारवाई करा. तसेच तक्रारीवर काय कारवाई केली याची माहिती संबंधित तक्रारदाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून द्या अशा सूचना आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार आयोगाला मिळालेल्या तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे.
ये चलने वाली नहीं गिरने वाली सरकार है…अखिलेश यादव यांचा लोकसभेत भाजपवर घणाघात
यासंदर्भात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक पोलीस कर्मचारी मतदाराची मतदान स्लीप फाडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर कानपूरमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या अधिकाऱ्यांनी मतदारांना परत पाठवल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर आयोगाने गंभीर दखल घेत कारवाई केल्याचे सांगण्यात आले.