Anand Mahindra : देशातील प्रसिद्ध महिंद्रा कंपनीचे मालक उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra )यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये (Kanpur)राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीने उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यासह 13 जणांवर फसवणुकीचा गुन्हा (Fraud)दाखल केला आहे. कानपूरमधील रायपूरवा पोलीस ठाण्यात महिंद्रांविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dhangar Reservation संदर्भात आता मंत्री महाजनच थेट उपोषणकर्त्यांशी चर्चा करणार
पोलिसांच्या माहितीनुसार, वृद्ध व्यक्तीचं म्हणणं आहे की, त्यांनी आपल्या मुलासाठी स्कॉर्पिओ कार (Scorpio car)खरेदी होती. काही काही दिवसांनी 14 जानेवारी 2022 ला स्कॉर्पिओचा अपघात झाला. अपघाताच्या वेळी त्यांनी सीट बेल्ट लावले होते. तरीही कारच्या एअरबॅग्ज उघडल्या नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. या सर्व घटनेमुळे वृद्ध व्यक्तीने आनंद महिंद्रासह (Anand Mahindra)13 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पंकजा मुंडेंनी शिवशक्ती यात्रा काढल्याने कारवाई झाली; बच्चू कडू यांचा थेट आरोप
कानपूरच्या (Kanpur) जुही कॉलनीमध्ये राहणाऱ्या राजेश मिश्रा यांनी 2020 मध्ये त्यांचा मुलगा अपूर्व मिश्रा याला महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार गिफ्ट दिली केली. तिरुपती ऑटो एजन्सीच्या शोरुममधून त्यांनी 17 लाख रुपयांना ही कार घेतली होती. 2022 मध्ये, कार खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी, त्यांचा मुलगा त्याच्या मित्रांसह लखनऊला गेला. 14 जानेवारी 2022 रोजी ते कानपूरला परतत असताना दाट धुक्यामुळे त्यांची कार डिव्हायडरला आदळली.
अपघातावेळी अपूर्व मिश्राने (Apoorva Mishra)सीट बेल्ट लावला होता, तरीही कारच्या एअरबॅग उघडल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलाला जीव गमवावा लागला. एअरबॅग्ज उघडल्या असत्या तर त्यांच्या मुलाचा जीव वाचला असता, असा त्यांनी आरोप केला आहे. या घटनेनंतर, त्यांनी शोरुममध्ये जाऊन संपूर्ण हकीकत सांगितली, तेव्हा एजन्सीच्या व्यवस्थापकाने त्यांना त्यांच्या कंपनीच्या संचालकांशी बोलायला लावले. यादरम्यान त्यांनी गैरवर्तन केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
त्यानंतर कंपनीकडून कोणतीही कारवाई न झाल्याने राजेश यांनी कारची टेक्निकल तपासणी केली, त्यात कारमध्ये एअरबॅग नसल्याचे आढळून आले. पीडित राजेश मिश्रा यांनी रायपुरवा पोलीस ठाण्यात दाद मागितली, परंतु त्याची सुनावणी झाली नाही, त्यानंतर त्याने न्यायालयात जाऊन आपली तक्रार दाखल केली. राजेश मिश्रा यांनी आनंद महिंद्रा, एजन्सीचे व्यवस्थापक चंद्र प्रकाश गुरनानी यांच्यासह 13 जणांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.