Dhangar Reservation संदर्भात आता मंत्री महाजनच थेट उपोषणकर्त्यांशी चर्चा करणार
Dhangar Reservation : अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) यशवंत सेनेच्या वतीने आंदोलन सुरु आहे. अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु असून हळूहळू आंदोलन आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा आमदार राम शिंदे यांनी या आंदोलनाला भेट दिली.
Prajakta Mali : …म्हणून प्राजक्ता माळीने आलोक राजवाडेला दिले होते पैसे
गेल्या वीस दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी चौंडी या ठिकाणी उपोषण सुरु आहे. शासन स्तरावर याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यावर दोन तास चर्चा झाली. चर्चा सकारात्मक आहे. तसेच आज मंत्री गिरीश महाजन हे आज उपोषणकर्त्यांच्या भेटीस येणार होते मात्र ढगाळ वातावरणामुळे विमानाने येणे शक्य नव्हते यामुळे ते अद्याप आले नाही.
‘बॅनर लावून मंत्री अन् मुख्यमंत्री होत नाही’; अनिल पाटलांनी बॅनरबाजीवरुन रोहित पवारांना घेरलं…
मात्र गिरीश महाजन हे पुन्हा एकदा उपोषणकर्त्यांच्या भेटीस येतील. माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे. महाजन हे या उपोषणाबाबत थेट यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांशी व उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी येणार आहे मात्र ढगाळ वातावरणात विमान प्रवास शक्य नसल्याने ते अद्याप चौंडी येथे पोहचू शकले नाही अशी माहिती भाजप आमदार राम शिंदे यांनी दिली.
आंबेडकरांची मोठी घोषणा; महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार, लोकसभेचं गणित बिघडणार?
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, धनगर समाजाच्या अपेक्षित मागण्या पूर्ण झाल्याचं पाहिजेत, पण धनगर समाजाच्या मागण्यांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेत कुठलेही विषय आडवे आले तर आरक्षण परत जात असतं, त्यामुळेच आरक्षण परत जाऊ नये टिकून रहावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.
तसेच टिकणारं आरक्षण मिळावं, यासाठी धनगर समाजाने वाट बघितली पाहिजे, कारण खूप वर्षांपासूनच हा प्रश्न प्रलंबित असून हा प्रश्न दोन मार्गाने समाजाने प्रश्न मांडला आहे, धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे काम सुरु असून सरकारने यामध्ये लक्ष घातले आहे, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस ते योग्य ते निर्णय घेणार असल्याचंही बावनकुळेंनी यावेळी सांगितलं आहे.