Download App

मोदी-योगींचं कौतुक करणं पडलं महागात; राजकीय वादातून चिरडलं…

Mirzapur Crime : उत्तर प्रदेशातील (UP)मिर्झापूर (Mirzapur)येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केल्यानं एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झालं असं की, एक व्यक्ती कारमध्ये बसला होता आणि राजकीय (Political) मुद्द्यावरुन त्याचा चालकाशी वाद झाला. वादानंतर चिडलेल्या चालकाने त्या व्यक्तीला त्याच्या बोलेरो गाडीने चिरडून ठार केले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage)आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे आरोपी चालकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. (Uttar pradesh mirzapur political discussion Narendra Modi Yogi Adityanath crime)

Supriya Sule : ट्विटरला धमकी देणं हे धक्कादायक, देशातील लोकशाहीला धोका; टीका करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी

सविस्तर माहिती अशी की, मिर्झापूरच्या विंध्याचल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलाही गावात सोमवारी सायंकाळी या घटनेची माहिती मिळाली. राजेशधर दुबे (50) असे मृत तरुणाचे नाव असून तो आपल्या पुतण्याच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दुबे यांच्या पुतण्याचे रविवारी कोल मिर्झापूर येथे लग्न झाले. सोमवारी सकाळी लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर दुबे आणि त्यांचे साथीदार लालजी मिश्रा, धीरेंद्र कुमार पांडे आणि इतर वऱ्हाडी मंडळींना नेण्यासाठी बोलेरो भाड्याने केली.

शिंदे आणि फडणवीस आज एकत्र कोल्हापूरला जाणार होते पण…?

सहप्रवाशांच्या म्हणण्यानुसार, प्रवासादरम्यान दुबे आणि कार चालक यांच्यात राजकीय वाद झाला. मृत व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल वाईट बोलण्यापासून ड्रायव्हरलाही रोखले तेव्हा प्रकरण तापल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या राजकीय मतभेदांमुळे संतप्त चालकाने कार थांबवली आणि दुबेंना गाडीतून बाहेर काढले, त्यानंतर दुबेंनी कारसमोर उभे राहून त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला.

ड्रायव्हरने दुबेंना कारनं उडवून सुमारे 20 मीटरपर्यंत ओढत नेल्यानं परिस्थितीनं हिंसक वळण घेतलं. इतर प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर चालकानं कार थाबवून घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी सहा तासांच्या शोधानंतर अमजद नावाच्या चालकाच्या मुसक्या आवळल्या. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर प्रवाशांच्या जबाबाच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Tags

follow us