Download App

‘बायको माझं रक्त पिते, त्यामुळे झोपच…’ पोलीस कॉन्स्टेबलसोबत भयंकर घडतंय

Pac Battalion Commander Blames Wife Drinks his Blood  : नवरा बायकोतील भांडण (Husband Wife Dispute) हा काही विशेष विषय नाहीये. परंतु एका व्यक्तीने दावा केलाय की, त्याची बायको त्याचं स्वप्नात रक्तच पिते. त्यामुळे त्याला रात्री झोप लागत (Sleeplessness) नाही. त्यामुळे नोकरीवर वेळेत येवू शकत नाही. ही घटना उत्तर प्रदेशमधून उघडकीस आलीय. उत्तर प्रदेशच्या निमलष्करी दलाच्या (Uttar Pradesh News) एका कॉन्स्टेबलने डीब्रीफिंगसाठी उशिरा येण्याचे कारण देण्यासाठी मिळालेल्या नोटीसवर हे उत्तर दिलंय.

सोशल मीडियावर लाखो लोकांनी शेअर केलेले हे पत्र 44 व्या बटालियन प्रादेशिक सशस्त्र कॉन्स्टेब्युलरी (पीएसी) च्या कमांडरला लिहिलं होतं. पीएसी सैनिकाला त्याच्या कामात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये त्याच्याकडून उत्तर मागितले गेले होते. ही नोटीस 17 फेब्रुवारी 2025 रोजी पाठवली गेली होती. पीएसी 44 च्या बटालियन जी-स्क्वॉड कमांडर मधु सुधन शर्मा यांनी कर्तव्यात गैरवर्तन केल्याबद्दल शिस्तभंगाचा इशारा दिला होता.

Santosh Deshmukh Case: …म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती उशीरा, CM फडणवीसांचा खुलासा…

आधी सुचना दिलेल्या असताना देखील तो दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ड्युटीवर आला. उशिरा येण्यामागील कारण कॉन्स्टेबलला विचारलं होतं. या नोटीसमध्ये कॉन्स्टेबलने दाढी का केली नाही? गणवेश चुकीचा का घातला? याचं स्पष्टीकरण मागितलं होतं. नोटीसनुसार, वारंवार उशिरा येत होता आणि कामात देखील रस दाखवत नव्हता.

नोटीसनुसार कॉन्स्टेबलने घोर निष्काळजीपणा आणि मनमानी (Wife Drinks Blood) केली होती. नोटीसमध्ये त्याने एका दिवसाच्या आत ऑफिसला लेखी स्पष्टीकरण सादर करावं, अशी मागणी केली होती, अन्यथा त्याच्यावर पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.

क्लासिक रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘नमस्ते लंडन’ पुन्हा प्रक्षेकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार रिलीज

उत्तरामध्ये कॉन्स्टेबलने अतिशय वेगळं आणि भावनिक कारण दिलेलं होतं. त्याने स्पष्ट केलं की, तो 16 फेब्रुवारी 2025 रोजी ड्युटीवर उशिरा आला होता. कारण तो वैयक्तिक कारणांमुळे रात्री झोपू शकत नव्हता. त्याने सांगितले की त्याचे त्याच्या पत्नीशी गंभीर वाद होत होतात. ती त्याच्या स्वप्नात छातीवर बसून त्याला मारण्याच्या उद्देशाने त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न करते. यामुळे त्याला निद्रानाशाचा त्रास होतोय. तो पुढे म्हणाला की, तो नैराश्य आणि चिडचिडेपणासाठी औषधोपचार देखील घेत आहे, ही माहिती इंडिया टुडेच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

दरम्यान, 44 व्या बटालियन पीएसीचे कमांडंट सत्येंद्र पटेल म्हणाले की, ते पत्राची चौकशी करत आहेत. हा कर्मचारी कोण आहे? त्याच्या समस्या काय आहेत? संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. जर त्याला समुपदेशनाची आवश्यकता असेल, तर ते केले जाईल. जर विभागीय मदतीची आवश्यकता असेल तर त्यासाठी देखील प्रक्रिया केली जाईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us