Download App

Asad Ahmed Encounter : ‘भाजपला न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही’, अखिलेश यादव यांचा योगींवर हल्लाबोल

Asad Ahmed Encounter : उत्तर प्रदेश पोलिसांच्या (UP Police) एसटीएफने झाशीमध्ये माफिया अतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काउंटर (Asad Ahmed Encounter) केला आहे. असद यांच्या एन्काऊंटरच्या घटनेवरून विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारवर हल्लाबोल केला आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट केले की, खोट्या चकमकी करून भाजप सरकार खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचा न्यायालयावर अजिबात विश्वास नाही. आजच्या नुकत्याच झालेल्या चकमकींचीही सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींना सोडता कामा नये. बरोबर काय अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार सरकारला नाही. भाजपला समाजात सलोखा टिकून ठेवायचा नाही.

Shital Mhatre : ‘दोघेही, एक ही थाली के चट्टे-बट्टे…’ म्हात्रेंचा राहुल गांधी आदित्य ठाकरेंवर निशाणा

दरम्यान, उमेश पालच्या आईने यूपी एसटीएफने केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. ही माझ्या मुलाला श्रद्धांजली असल्याचे वकील उमेश पाल यांची आई शांती देवी यांनी म्हटले आहे. माजी खासदार अतिक अहमद यांचा मुलगा असद आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या एन्काउंटरनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठक घेतली. सीएम योगी यांनी यूपी एसटीएफ तसेच डीजीपी, विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले. प्रधान गृह सचिव संजय प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांना एसटीएफच्या कारवाईची माहिती दिली.

गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास असद आणि गुलामचा एन्काउंटर झाला. झाशीपासून 7 किमी अंतरावर असलेल्या यूपीच्या झाशीच्या बरका गावात परिछा धरणावर ही चकमक झाली. या चकमकीत 12 जणांचा सहभाग होता, ज्यामध्ये 2 डेप्युटी एसपी आणि 2 इन्स्पेक्टरही सहभागी झाले होते. पोलिसांनी 2 विदेशी पिस्तुलेही जप्त केली आहेत. या चकमकीत 40 राऊंड गोळीबार झाल्याची माहिती आहे.

Video : भाजप धर्माच्या नावाने एन्काउंटर करते; असदच्या खात्म्यानंतर भडकले ओवैसी

उमेश पाल हत्येप्रकरणी अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ, पत्नी शाइस्ता परवीन, अतीकचे दोन मुलगे, अतिकचे साथीदार गुड्डू मुस्लिम आणि गुलाम आणि इतर नऊ जणांवर हल्ल्याचा आरोप करण्यात आला होता. सुमारे पंधरवड्यात दुसऱ्यांदा अतिक अहमदला बुधवारी गुजरातमधील साबरमती कारागृहातून उत्तर प्रदेशातील नैनी मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले.

अतीक सायंकाळी सहा वाजता नैनी कारागृहात पोहोचला आणि उशीर झाल्यामुळे त्याला बुधवारी न्यायालयात हजर करता आले नाही. दरम्यान बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल आणि त्याच्या दोन सुरक्षा रक्षकांची 24 फेब्रुवारीला धुमानगंज परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Tags

follow us