Video : भाजप धर्माच्या नावाने एन्काउंटर करते; असदच्या खात्म्यानंतर भडकले ओवैसी

Asaduddin Owaisi On Asad Ahmed Encounter : गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असद अहमदच्या अन्काउंटरनंतर देशातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. या कारवाईवर देशातील अनेक विरोधीपक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरूवात केली आहे. असदच्या एन्काउंटरनंतर AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
#WATCH | Will the BJP also shoot those who killed Junaid and Nasir? No, because you (BJP) do encounters in the name of religion. You want to weaken the rule of law, do encounter of the Constitution: AIMIM MP Asaduddin Owaisi in Telangana's Nizamabad pic.twitter.com/H0a1xqRIC3
— ANI (@ANI) April 13, 2023
ते म्हणाले की, भाजप महजबच्या नावाने एन्काउंटर करते. न्यायालये आणि न्यायाधीश कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करत न्यायालये बंद करा असे ते म्हणाले. ज्यांनी जुनैद आणि नसीर यांना मारले, त्यांना भाजपचे लोक गोळ्या घालतील का, नाही?” कारण ते केवळ धर्माच्या नावावर एन्काउंटर करत असल्याचे गंभीर आरोप ओवैसी यांनी यावेळी केला. अशाप्रकारे जर एखाद्याचे एन्काउंटर केले जात असेल तर ते एन्काउंटर नाही तर, कायद्याची पायमल्ली आहे. जर तुम्ही ठरवले की, गोळ्या घालून न्याय देणार, तर न्यायालये बंद करा असा सल्लादेखील यावेळी ओवैसींनी दिला.
Asad Ahemad : १० हजार चकमकी अन् १७२ हून अधिक एन्काउंटर; योगी सरकारचा असाही ‘रेकॉर्ड’
असदुद्दीन ओवेसी यांच्याशिवाय सपा प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, खोट्या चकमकी करून भाजप सरकार खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचा न्यायालयावर अजिबात विश्वास नाही. आजच्या झालेल्या चकमकीचीही सखोल चौकशी झाली पाहिजे असे ते म्हणाले. काय बरोबर काय अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार सत्तेला नसल्याचेही ते म्हणाले.