Download App

भोलेबाबांच्या सत्संगात मृत्यू तांडव; शंभरहून अधिक जणांचा गेला जीव, महिलांची संख्या सर्वाधिक

दुर्घटनेत 107 जणांचा मृत्यू झाल्याच हिंदुस्थान टाइम्सने म्हटलंय. मृतांमध्ये महिलांचा आकडा जास्त. तर 122 जणांचे मृत्यू झाल्याचे भास्करचे वृत्त

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Uttar Pradesh Stampede At Bhole Baba Satsang In Hathras: उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. फुलराई गावात भोले बाबा सत्संगात मंगळवारी चेंगराचेंगरी झाली आहे. त्यात आता मृतांचा आकडा वाढला आहे. सुरुवातीला जिल्हा प्रशासनाकडून 27 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु आता मृताचा आकडा वाढला असून, 50 ते 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाथरसचे जिल्हाधिकारी आशिष कुमार यांनी दिली आहे. तर शंभरहून अधिक जखमी आहे. त्यात काही गंभीर असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तर काही हिंदी वेबसाइटने मृतांचा आकडा जास्त असल्याचे म्हटले आहे.

बालबुद्धी म्हणून सोडू नये, कठोर कारवाई व्हावी; मोदींकडून राहुल गांधींच्या हिंदूंबाबतच्या वक्तव्याचा समाचार

या दुर्घटनेत 107 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे. मृतांमध्ये महिलांचा आकडा हा जास्त आहे. तर भास्करने 122 जणांचे मृत्यू झाले आहेत. तर 150 हून अधिक जण जखमी झाले असल्याचे म्हटले आहे. त्याला पुष्टी देणारी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. आतापर्यंत 50-60 जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर सांगत आहेत. पण गंभीर जखमी जास्त असल्याने मृत्यूची संख्या वाढू शकते, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.


तुम्हाला हे शोभत नाही; मोदींच्या भाषणात गोंधळ घालणाऱ्या राहुल गांधींना ओम बिर्लांनी खडसावले

या घटनेत आतापर्यंत 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मला डॉक्टरांनी दिली आहे. त्यात आणखी काही लोक अडकलेले आहे. त्यातील काही जण मृत झालेले असावे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. हा सत्संग सोहळा खासगी होता. या सोहळ्याला उपविभागीय अधिकारी यांना परवानगी दिलेली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मृतांचा ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर जखमींना उपचारासाठी तत्काळ मदत करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याचे प्राथमिक कारण प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी प्रशासनाला दिले आहेत. मृतांप्रती योगी आदित्यनाथ यांनी दुख: व्यक्त केले आहे.जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, संदीप सिंह हे घटनास्थळी रवाना झाले आहे. तर राज्याचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालकही घटनास्थळी रवाना झाले आहेत.

follow us

वेब स्टोरीज