Uttarkashi Tunnel Rescue: ऐन दिवाळीत उत्तराखंडमधील उत्तरकाशी शहरात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ४० मजूर त्यात अडकले होते. आता आठवड्यानंतरही कोसळेल्या बोगदद्यातून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात बचावकार्याला यश येत नसल्यानं त्याचे नातलग चिंताग्रस्त आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांची संख्या ४० नसून ४१ असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. दरम्यान, कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपच्या साहाय्याने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.इंदूरहून आणलेले तिसरे आधुनिक ऑगर मशीन घटनास्थळी पोहोचले आहे. बोगदा बांधणारी सरकारी कंपनी नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेकडून अडकलेल्या मजुरांची संख्या ४० नसून ४१ असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील दीपक कुमार असे 41 व्या कामगाराचे नाव आहे.
दरम्यान, बोगद्यात पडलेला ढिगारा फोडून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शुक्रवारपासून थांबवलेले बचावकार्य शनिवारी पुन्हा सुरू झाले. कामगारांना वाचवण्यासाठी इंदूरहून मागवण्यात आलेल्या उच्च क्षमतेच्या उत्खनन यंत्राद्वारे डोंगराच्या माथ्यावरून आणि इतर बाजूंनी उत्खनन केले जाणार आहे. उभ्या ड्रिलिंगसाठी चार ठिकाणं ठरवण्यात आली. तेथे पोहोचण्यासाठी ट्रॅक बांधण्याचे बॉर्डर रोड ऑर्गनायझेनकडे दिलं. परदेशी तज्ज्ञांच्या मदतीने केंद्र आणि राज्यातील सहा पथके बचावकार्य करत आहेत.
बोगद्याच्या अंधारात कामगारांची प्रकृती बिघडत चालली आहे. त्यामुळं त्यांचं कुटुंबीय चिंताग्रस्त आहे, असं अडकलेल्या एका कामगाराचा भाऊ हरिद्वार शर्मा यांनी सांगिलतलं. . प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत. कंपनी किंवा सरकार काहीही करत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. दरम्यान, आज सीएम पुष्कर सिंह धामी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सिलकारा येथे पोहोचणार आहेत.
तर नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक अंशू मनीष खालखो यांनी सांगितले की, वरून ड्रिलिंगसाठी केलेल्या वैज्ञानिक सर्वेक्षणांतर्गत सुमारे 103 मीटर रुंद परिसरात ड्रिलिंग केले जाईल. त्याचवेळी बोगद्याच्या वरच्या भागासह उभ्या खोदकामाची योजना असल्याचे महामंडळाचे कार्यकारी संचालक संदीप सुगेरा यांनी सांगितले. शीर्षस्थानी रुंदी 103 मीटर आहे आणि बाजूंपासून ड्रिलिंग अंतर 177 मीटर आहे. वरून ड्रिलिंग करून कामगारांना अन्न व पाण्याचा पुरवठा केला जाईल. त्यानंतर त्यांना बाहेर काढले जाईल.