How 41 Labor Stuck In Uttarkashi Tunnel : उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) गेल्या 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांची काळकोठडी थोड्याचवेळात संपणार असून, अथक प्रयत्नांनंतर अखेर बोगद्यात अडकलेल्या सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले जाणार आहे. मात्र, हे मजूर नेमके कसे अडकले होते. 17 दिवसांपूर्वी नेमकं काय घडलं होते हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
Online Payments : 2 हजारांपेक्षा अधिक रक्कम पाठवताना 4 तासांची प्रतिक्षा?
कसे आडकले 41 मजूर?
12 नोव्हेंबरला सिल्क्यरा बोगद्याजवळ मजूर नेहमीप्रमाणे काम करत होते. त्यावेळी अचानक पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळण्यास सुरुवात झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अनेक कामगारांनी बाहेर पळ काढला. परंतु, त्याचवेळी अचानक निर्माणाधीन बोगद्याचा 60 मीटरचा भाग खचला आणि 41 कामगार बोगद्यात अडकून पडले.
Video : CM शिंदे तेलंगणात कोणत्या भाषेत बोलणार?; उद्धव ठाकरेंना चिंता अन् उत्सुकता
बोगद्याचे किती काम पूर्ण झाले आहे?
ज्या बोगद्यात गेल्या 17 दिवसांपासून 41 मजून अडकून पडले होते त्या सिल्क्यरा बोगद्याचे 2340 मीटरचे काम पूर्ण झालेले आहे. तर उर्वरित काम सुरू होते. त्यावेळी अचानक मोठी दरड कोसळली. कोसळलेल्या दरडीचा ढिगाऱ्याची लांबी सुमारे 60 मीटर होती आणि कामगार 260 मीटरच्या वर अडकले होते.
कसं ठेवले तणावमुक्त?
बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी स्थानिक पातळीसह विदेशातील अनेक संस्थांचीही मदत घेतली जात असून, आतील मजुरांसाठी आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता केली जात आहे. आत अडकलेल्या मजुरांची मानसिक स्थिती उत्तम ठेवण्याचे मोठे आव्हान तज्ज्ञांवर होते. यासाठी तज्ज्ञांकडून मजुरांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात होते. तणावमुक्त राहण्यासाठी बाहेरून मजुरांना योगा, प्राणायम आदी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. याशिवाय वेळ घालवण्यासाठी लुडो, पत्ते आणि बुद्धिबळ बोगद्याच्या आत पाठवण्यात आले होते.
Uttarkashi Tunnel Accident: उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत अदानींचा काय संबंध? अदानी समुहाकडून स्पष्टीकरण
कुटुंबियांसोबत सुरू होता संवाद
बोगद्यात अडकलेल्या मजुरांचा त्यांच्या कुटुंबियांशी संवाद व्हावा यासाठी पाईपच्या मदतीने बोगद्यातील मजुरांना मोबाईल फोन, चार्जर पाठवण्यात आले होते. यामुळे या सर्वांना त्यांच्या कुटुबियांशी संवाद होत होता. तर अन्यवेळी वेळ जावा यासाठी काही जण विविध प्रकारे त्यांना फिट ठेवण्यासाठी गेम, व्यायाम आदी गोष्टी करत होते.
कोणत्या राज्यातील आहेत मजूर
गेल्या 17 दिवसांपासून बोगद्यात अडकलेले मजूर हे देशभरातील विविध राज्यातील आहेत. यात उत्तराखंडमधील 2, हिमाचल प्रदेश 1, उत्तर प्रदेशातील 8, बिहारमधील 5, पश्चिम बंगालमधील 3, आसामचे 2, झारखंड राज्यातील 15, ओडिशातील 5 मजुरांचा समावेश आहे.