Download App

मैं फकीर हूं! मोदींकडे घर, जमीन-जुमला अन् गाडी काहीच नाही पण..,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार अर्ज दाखल केला असून उमेदवार अर्जात आपल्या संपत्तीची माहिती दिलीयं.

Pm Narendra Modi Property : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून (varanasi constituency) निवडणुकीचा अर्ज दाखल केलायं. पंतप्रधान मोदींनी अर्ज दाखल करताना आपल्याकडे असलेल्या संपत्तीची माहितीही अर्जात नमूद केलीयं. अर्जात दिलेल्या माहितीनुसार मोदींकडे घर, जमीन-जुमला आणी गाडी काहीच नसल्याची माहिती देण्यात आलीयं. त्यामुळे मैं फकीर हूं हे मोदींचे शब्द खरे ठरले असल्याचं दिसून येत आहे. मात्र, मोदींकडे घर, जमीन, गाडी नसली तरीही एकूण 3 कोटी 2 लाख रुपयांची संपत्ती असल्याचं अर्जात स्पष्ट करण्यात आलंय.

खिलाडी कुमार आणि प्रभासच्या आगामी चित्रपटाचा टीझर जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात होणार प्रदर्शित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रोख स्वरुपात 52 हजार 920 रुपये असून 2 कोटी 85 लाख रुपयांच्या बॅंकेत ठेवी आहेत. तर 2 लाख 67 हजार रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या मोदींकडे असल्याची माहिती नमूद करण्यात आलीयं. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींची 9 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक असून NSC मधील गुंतवणूक 2019 मध्ये 7.61 लाखांवरून जवळपास 2 लाखांनी वाढली आहे. तसेच मोदींच्या नावावर कोणतेही कर्ज नसून पगार आणि बॅंकेकडून मिळणारे व्याज हेच त्यांचं उत्पन्नाच साधन असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Ghatkopar Hoarding Collapse नंतर सरकारला धडा; मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील सर्व होर्डिंग्जच्या ऑडिटचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कला शाखेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण गुजरात विद्यापीठातून पूर्ण केलं असून 1978 साली त्यांनी पदवीचं शिक्षण दिल्ली विद्यापीठात घेतलं. तर 1967 साली गुजरात बोर्डातून दहावीचं शिक्षण घेतलं. ‘जशोदाबेन’ त्यांच्या पत्नीचं नाव असून पत्नीच्या उत्पन्नाबाबत माहिती उपलब्ध नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. तर मोदींविरोधात कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नाही किंवा थकबाकी नसल्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीर केलंय.

T20 वर्ल्डकप शेड्यूलमध्ये गडबड; 24 तासांपेक्षा कमी वेळात सेमी फायनल अन् फायनल?

मोदींनी आज केंद्रीय मंत्री अमित शाहा, राजनाथ सिंह, जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलायं. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी काशीमध्ये आशीर्वाद घेत गंगेत पवित्र स्नान केले. त्यानंतर गंगा सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर दशस्वमेध घाटावर विधी आणि आरती केली. त्यानंतर मोदींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलायं.

दरम्यान, देशात सत्ता खेचून आणण्यासाठी एनडीएसह इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात इंडिया आघाडीकडून उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय हे रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे आता मोदींच्या विरोधात अजय राय बाजी मारणार की पुन्हा मोदीच विजय खेचून आणणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us