Vice President Jagdeep Dankhad : उपराष्ट्रपती जगदीप धनखड(Jagdeep Dankhad) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची(Narendra Modi) तुलना राष्ट्रपिता महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांच्याशी केली आहे. महात्मा गांधी महापुरुष तर पंतप्रधान नरेंद्र मोदी युगपुरुष असल्याचं विधान जगदीप धनखड यांनी केलं आहे. जैन विचारक तत्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंती सोहळ्यादरम्यान जगदीप धनखड बोलत होते. धनखड यांच्या या विधानामुळे काँग्रेसकडून संतापजनक प्रतिक्रिया देण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.
मैं आपको एक बात कहना चाहूंगा, पिछली शताब्दी के महापुरुष महात्मा गांधी थे, इस शताब्दी के युगपुरुष नरेंद्र मोदी हैं!
महात्मा गांधी ने सत्य और अहिंसा से हमें अंग्रेजों की गुलामी से छुटकारा दिलाया, भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने देश को प्रगति के उस रास्ते पर डाल… pic.twitter.com/mBP7zxIs0C
— Vice President of India (@VPIndia) November 27, 2023
महात्मा गांधी यांनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला योग्य मार्गावर नेले आहे. एक गोष्ट सांगायची आहे, महात्मा गांधी हे गेल्या शतकातील महापुरुष होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष असल्याचं विधान जगदीप धनखड यांनी केलं आहे. तसेच महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये श्रीमद राजचंद्रजी यांची शिकवण दिसून येते असंही ते म्हणाले आहेत.
राष्ट्राच्या विकासाला विरोध करणारी शक्ती आणि देशाचा उदय पचवू शकणार नसल्याची शक्ती एकत्र येत असून जेव्हा देशात काही चांगलं घडतं तेव्हा हे लोकं वेगळ्या भूमिकेत जात आहेत. असं व्हायला नको, मोठा धोका आहे, ज्या देशांना तुम्ही पाहतायं त्यांचा इतिहास 300,500, आणि 700 वर्षांपूर्वीचा आहे, मात्र आपल्या देशाचा इतिहास 5 हजार वर्षांपूर्वीचा असल्याचंही जगदीप धनखड म्हणाले आहेत.
अवकाळीचा तडाखा… पालकमंत्री विखे यांनी दिल्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना
हे तर लाजिरवानच…
उपराष्ट्रपतींनी केलेल्या या विधानावर काँग्रेसनं आक्षेप घेतला असून हे लाजीरवानं असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस नेते माणिकम टागोर यांनी आपल्या ट्वीटर पोस्टमध्ये म्हटलं की, जर तुम्ही पंतप्रधान मोदींची तुलना गांधीजींशी करत असाल तर हे लाजीरवानं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की तुलना करायला पण एक मर्यादा असते, तुम्ही ती ओलांडली आहे.
दरम्यान, बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धनखर यांनी महात्मा गांधी आणि मोदींबद्दल केलेल्या टिप्पणीवर आश्चर्य व्यक्त केले, गैरवर्तनाचे स्वातंत्र्य देऊन कोणते नवीन युग सुरू झाले? असल्याची प्रतिक्रिया अली यांनी दिली आहे.