Jagdeep Dhankhar Resigns : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. मी संविधानाच्या कलम 67 (अ) नुसार भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ राजीनामा देत आहे. माझ्या कार्यकाळात आमच्यात असलेल्या आनंददायी आणि अद्भुत कामकाजाच्या संबंधांबद्दल मी भारताच्या माननीय राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो. असं राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात जगदीप धनखड म्हणाले.
मी माननीय पंतप्रधान आणि आदरणीय मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांचे सहकार्य आणि पाठबळ अमूल्य राहिले आहे आणि मी माझ्या कार्यकाळात बरेच काही शिकलो आहे. संसदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांकडून मला मिळालेला कळकळ, विश्वास आणि प्रेम माझ्या कायम स्मरणात राहील. या प्रतिष्ठित पदाचा निरोप घेताना, मला भारताच्या जागतिक उदयाचा आणि अभूतपूर्व कामगिरीचा अभिमान वाटतो आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यावर अढळ विश्वास आहे. असं देखील या पत्रात जगदीप धनखड यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता, परंतु दोन वर्षांपूर्वी त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. जगदीप धनखड यांनी तीन वर्षांपूर्वी 6 ऑगस्ट रोजी देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.
Vice President #JagdeepDhankhar resigns from his post “to prioritise health care and abide by medical advice.” pic.twitter.com/XRnMNP3XN7
— All India Radio News (@airnewsalerts) July 21, 2025
पश्चिम बंगालचे राज्यपाल
उपराष्ट्रपती होण्यापूर्वी धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. याशिवाय ते 1989 ते 1991 पर्यंत झुंझुनू लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. व्हीपी सिंह आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते केंद्रात मंत्रीही राहिले आहेत.
मोठी बातमी, 22 जुलैला एसबीआयचा UPI राहणार बंद, ‘इतक्या’ तासांसाठी मिळणार नाही सर्व्हिस
धनखड यांचा जन्म 18 मे 1951 रोजी राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यात झाला असून त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. नंतर ते चित्तोडगड सैनिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी गेले. सैन्यात अधिकारी होण्यासाठी त्यांची एनडीएमध्ये निवड झाली. त्यानंतर राजस्थान विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. जयपूरमध्ये राहून त्यांनी बराच काळ कायद्याचा अभ्यास केला.