MEA & India Army Press Confrance Over India Pak Tension : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सातत्याने भारताच्या विविध भागांवर हल्ला करत आहे. या सर्व घडामोडींबाबत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi ) यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने प्रत्युरात केलेल्या कारवाईत सियालकोट येथील एअरबेसवर हल्ला करत त्याला उद्ध्वस्त केले आहे.
चर्चेतून तोडगा काढा, युद्धाच्या मार्गाने जाणं योग्यनाही; जी7 देशांचं भारत-पाकिस्तानला आवाहन
पाकिस्तानचे 7 एअरबेग्स नेस्तनाबूत
पाकिस्तानकडून २६ हून अधिक ठिकाणी हल्ले करण्यात आल्याचेही यावेळी कुरेशी यांनी सांगितले. पाकिस्तानकडून (India-Pakistan War) वारंवार भारताच्या नागरी वस्त्यांवर हल्ला करत असल्याचेही कुरेशी यांनी यावेळी सांगितले. तसेच आम्हाला सीमेवर तणाव वाढवायचा नसल्याचेही त्या म्हणाल्या. पण पण पाकिस्तानकडून चिथावणीखोर कारवाया केल्या जात आहेत. पाकिस्तानच्या रफिकी, मुरीद, चकलाला, रहिम यार, सुकूर या हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. या पाच ठिकाणी भारतीय वायूदलाच्या फायटर जेटनी हल्ला केला. यामध्ये कुसूर येथील रडार आणि सियालकोट येथील लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले.
India-Pak War : विश्वयुद्ध ते भारत-पाक तणाव…; करोडोंंचा जीव वाचवणाऱ्या सायरनचा इतिहास काय?
पाककडून शाळांवर हल्ले
कर्नल सोफिया कुरेशी पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानकडून उधमपूर, भुज, भटिंडा, पठाणकोटसह ५ ठिकाणी उपकरणांचे नुकसान झाले असून, श्रीनगर, अवंतीपूर येथे वैद्यकीय संकुल आणि शाळेला लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तान नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून करत असून, पाकिस्तानचा हा दृष्टिकोन बेजबाबदार आहे.
“पाकिस्तानी सैन्याने पश्चिम सीमेवर आक्रमक कारवाया सुरू ठेवल्या आहेत. त्यांनी ड्रोन, लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांचा वापर करून भारतीय लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. एवढेच नव्हे तर, पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील २६ हून अधिक ठिकाणी हवाई घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आला. या सर्वांना भारतीय सशस्त्र दलांनी यशस्वीरित्या निष्प्रभ केले. पाकिस्तानने पहाटे १:४० वाजता पंजाबमधील हवाई तळाला लक्ष्य करण्यासाठी हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचेही यावेळी कुरेशी यांनी सांगितले.
टेरीटोरीअल आर्मी अॅक्टिव्ह; सचिन अन धोनीसह अनेकांना जावं लागू शकत युद्ध मैदानात
पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात : लष्कर
पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करत असून, भारतीय लष्कराचं एस ४०० आणि ब्रह्मोसचा साठा पूर्णपणे सुरक्षित असून, भारताचे सर्व एअरबेस सुरक्षित असून, पाकिस्तानकडून करण्यात येत असलेले दावे पूर्णपणे खोटे आहेत. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे बरेच नुकसान केले आहे. परराष्ट्र सचिव म्हणाले की, पाकिस्तान खोट्या बातम्या पसरवण्याचे काम करत असून, सिरसा, आदमपूर हवाई तळांना झालेल्या नुकसानीचे दावे पूर्णपणे खोटे आहेत. पत्रकार परिषदेदरम्यान, या एअरबेसचे फोटोदेखील दाखवण्यात आले. ज्यात ही स्रव ठिकाणं सुरक्षित असल्याचे दिसून येत आहेत.
India-Pak War : पाकिस्तानची आता खैर नाही; मोदी सरकारचा लष्करप्रमुखांना विशेष अधिकारपाकिस्तान नागरी ठिकाणांना लक्ष्य करत असून यात विशेषतः जम्मू आणि पंजाबमध्ये हल्ले करण्यात आले आहेत. आज सकाळीही पाकिस्तानने राजौरीमध्ये गोळीबार केला, ज्यामध्ये एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. याशिवाय जालंधर आणि फिरोजपूर येथेही हल्ले झाल्याचे परराष्ट्र सचिवांनी सांगितले. अमृतसरवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले, हे बालिश आरोप असून, हे देशाचे विभाजन करण्याचे षड्यंत्र असल्याचेही मिस्त्री यांनी सांगितले.