Download App

Video : पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले पाकिस्तानी चौक्या अन् दहशतवादी लाँचपॅड

एएनआय, नवी दिल्ली. ज्या ठिकाणांहून पाकिस्तान ट्यूब लाँच ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता, ती ठिकाणे

Operation Sindoor  : पाकिस्तान ज्या ठिकाणांहून ट्यूब लाँच ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता, ती ठिकाणे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केली आहेत. (Sindoor ) भारतीय सैन्याने पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त केले आहेत. भारतीय लष्कराने या भागात जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली देखील सक्रिय केली आहे.

एएनआय, नवी दिल्ली. ज्या ठिकाणांहून पाकिस्तान ट्यूब लाँच ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता, ती ठिकाणे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केली आहेत. भारतीय सैन्याने पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त केले आहेत.

मोठी बातमी! भारतीय सैन्यदलाकडून जोरदार पलटवार; २८ दहशतवाद्यांचा केला खात्मा

संरक्षण सूत्रांनी एएनआयला सांगितले की, पाकिस्तानमधील किमान चार हवाई तळांवर भारतीय हल्ल्यांचे लक्ष्य करण्यात आले आहे. भारतीय लष्कराने या भागात जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली देखील सक्रिय केली आहे.

पाकिस्तानने 26 ठिकाणांना लक्ष्य केले होते

शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारतातील 26 ठिकाणी ड्रोन हल्ले केले. यानंतर भारताने प्रत्युत्तर देत सर्व ड्रोन नष्ट केले. सध्या नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी अधूनमधून गोळीबार सुरू आहे.

 

follow us