Haldi Water Trend : सध्या सोशल मीडियावर हळदीची ( Haldi Water Trend) चांगलीच चर्चा रंगलीयं. काचेच्या ग्लासात पाणी घेत त्यात हळद टाकण्याचा एक भन्नाट ट्रेंड जगभरात लोकप्रिय होत असल्याचं दिसून येतंय. या ट्रेंडवर अनेक लोकं व्हिडिओ रिल्स बनवत असल्याचं समोर आलंय. मात्र, हा ट्रेंड ब्लॅक मॅजिकचा प्रकार आहे का? की हा ट्रेंड घातक आहे? याबाबत अनेकांनी आपापल्या दृष्टीकोनातून सांगितलंय.
सोशल मीडियावर हा ट्रेंड सुरु झाल्यानंतर जगभरातील अनेक नागरिकांनी हा प्रयोग केला आहे. मात्र, चर्चेमध्ये हा ट्रेंड घातक ठरु शकतो, किंवा ब्लॅक मॅजिक असल्याच्याही चर्चांना उधाण आलंय.
ज्येष्ठ ज्योतिषी अरुणकुमार व्यास यांनी या ट्रेंडविषयी गंभीर इशारा दिला असून त्यांच्या म्हणण्यानुसार पाण्यात हळद टाकणं ही एक तांत्रिक क्रिया आहे. सहजासहजी ती कोणीही करु नये, असं केल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होऊन भूत प्रेतांना निमंत्रण मिळू शकतं, असं व्यास यांनी स्पष्ट केलंय.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ही क्रिय आपल्या कुंडलीतील चंद्र आणि गुरु ग्रहांना कमजोर करते, त्याचा थेट परिणाम मानसिक स्थैर्य, निर्णयक्षमता व भाग्यावर होऊ शकतो. ही कृती पूर्णपणे अपायकारक असून त्यामुळे घरातील सुखशांतीवरही वाईट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हा प्रयोग कोणीही करु नये, अशी विनंती व्यास यांनी केलीयं.
तर दुसरीकडे सोशल मीडिया व्लॉगर नाफिया अनस हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने व्हिडिओमध्ये ‘कानपूर टेक’ असं कॅप्शन दिलं असून नाफिया हिने टॉर्च पेटवत एका ग्लासात पाणी घेतलंय. या पाण्यात तिने हळदऐवजी गुटख्याचे पॅकेट खाली केलंय. या प्रयोगामध्येही हळदीप्रमाणेच लाईट्सचा परिणाम दिसून आला आहे. तिच्या या व्हिडिओमुळे सर्वांनाच तिने गोंधळात टाकलंय. किती सुंदर दृश्य, कानपूरचे मंत्रमुग्ध करणारेर हे दृश्य असल्याचं तिने ट्रेंडमध्ये लिहिलंय.
ही आत्मा बोलवण्याची क्रिया…
पाण्यात हळद टाकण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. या ट्रेंडबद्दल चिंता व्यक्त करताना एका युजर्सने ही मृत आत्म्यांना बोलावण्याची क्रिया असून ब्लॅक मॅजिक असल्याचा दावा या युजर्सकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता लोकांचं जीवन धोक्यात येऊ शकतं अशीही भीती व्यक्त करण्यात आलीयं.