Download App

Video : बायडन यांचा हात धरला; अनेकांसोबत फोटो काढले; कोणार्क चक्राचे महत्त्व काय?

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : G20 परिषदेचे (G20 Summit New Delhi ) नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात सुरूवात झाली असून, जगभरातील नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आदर देत स्वागत केले. यावेळी मोदींकडून भारताच्या संस्कृतीशी संबंधित कोणार्क चक्राची (Konark Chakra) ओळख करून दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचा हात धरून मोदींनी या चक्राबद्दल माहिती दिली. तसेच जगभरातील अनेक नेत्यांसोबत कोणार्क चक्रासमोर फोटोदेखील काढले बायडन यांचा हात धरून माहिती दिलेल्या कोणार्क चक्राचे नेमके महत्त्व काय हे आपण जाणून घेऊया. (Importance Of Konark Chakra)

G20 Summit : जगात विश्वासाचे संकट; PM मोदींकडून जगभरातील नेत्यांना ‘सबका साथ…’ चा मंत्र

आज (दि.9) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम येथे G20 साठी भारतात दाखल झालेल्या परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी कोणार्क चक्राची पाहुण्यांना माहिती दिली. हे कोणार्क चक्र 13व्या शतकात नरसिंहदेव-1 च्या कारकिर्दीत तयार करण्यात आलेले असून, हे चक्र भारताच्या प्राचीन ज्ञान, सभ्यता आणि स्थापत्यशास्त्राच्या श्रेष्ठतेचे प्रतीक मानले जाते. हे लोकशाहीचे शक्तिशाली प्रतीक म्हणूनही काम करते.

G20 शिखर परिषदेच्या संबोधनातही पंतप्रधानांनी ‘इंडिया’चा वापर टाळला; म्हणाले भारत…

हे चक्र ओडिशातील कोणार्क येथील सूर्य मंदिरात बनवण्यात आले असून, भारतीय चलनी नोटांवरही कोणार्क चक्र छापलेले आहे. सुरूवातीच्या काळात चलनातील 20 रुपयांच्या नोटांवर हे छापण्यात आले होते. त्यानंतर 10 रुपयांच्या नोटेवरही हे छापण्यात आले. या चक्राला 24 आरे असून भारताच्या राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी हेच चक्र मोठ्या सन्मानाने झळकत आहे.

G20 Summit या परिषदेचा इतिहास आणि उद्देश काय? जाणून घ्या सविस्तर…

युनेस्कोनं 1984 साली ओडिशाच्या कोणार्क सूर्य मंदिराला जागतिक वारसा म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले. कोणार्क हे ओडिशातील पुरीपासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. या चक्राला काळाचं प्रतीक अर्थात कालचक्र म्हणूनही ओळखलं जातं. शिवाय जगात सातत्यपूर्ण विकास व बदलाचं ते प्रतीक ठरलं आहे. यातील 8 आरे दिवसाचे 8 तास सांगतात. असे मानले जाते की, याचा वापर करून सूर्याच्या स्थितीनुसार वेळ मोजली जाते. त्याशिवाय असेही मानले जाते की, चाकांच्या 12 जोड्या वर्षाचे 12 महिने दर्शवतात आणि 24 आरे दिवसाचे 24 तास दर्शवतात.

Tags

follow us