G20 Summit : जगात विश्वासाचे संकट; PM मोदींकडून जगभरातील नेत्यांना ‘सबका साथ…’ चा मंत्र

  • Written By: Published:
G20 Summit : जगात विश्वासाचे संकट; PM मोदींकडून जगभरातील नेत्यांना ‘सबका साथ…’ चा मंत्र

नवी दिल्ली : संपूर्ण जागाचे लक्ष लागलेल्या भारतातील G20 परिषदेला नवी दिल्लीत मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सहभागी झालेल्या प्रमुख नेत्यांचे स्वागत केले. यानंतर भाषणाला सुरूवात करताना त्यांनी मोरोक्कोतील भीषण भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांदली वाहिली. यानंतर त्यांनी जगात विश्वासाचे संकट असून, यावर मात करण्यासाठी ‘सबका साथ सबका विकास’ हा एकमेव मार्ग असल्याचा कानमंत्र जगातील प्रमुख नेत्यांना दिला. (PM Modi Speech In G-20 Opening)

G20 Summit या परिषदेचा इतिहास आणि उद्देश काय? जाणून घ्या सविस्तर…

मोदी म्हणाले की, हीच ती वेळ आहे जेव्हा जुनी आव्हाने आपल्याला नव्याने समाधान मागत आहेत. या आव्हानांमधून आपल्या सर्वांना मानवी शांततेच्या दृष्टीकोनातून सर्व जबाबदाऱ्या अचूकपणे पार पाडत मार्गक्रमण करावे लागणार आहे. कोरोना आणि युद्धजन्य परिस्थिमुळे जगावर विश्वासाचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

जेव्हा आपण कोविडला पराभूत करू शकतो, तेव्हा आपण परस्पर विश्वासाच्या या संकटावरही मात करू शकतो असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. आपण सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा मंत्र आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक बनू शकतो असे मोदी म्हणाले.

G20 शिखर परिषदेच्या संबोधनातही पंतप्रधानांनी ‘इंडिया’चा वापर टाळला; म्हणाले भारत…

उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, येथून काही किलोमीटर अंतरावर सुमारे अडीच हजार वर्षे जुना एक स्तंभ आहे, ज्यावर प्राकृत भाषेत हेवं लोकश:हित मुखेति, अथ: इयं नातेशु हेवं असे लिहिलेले आहे. यातून मानवतेचे हित आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित केले जाते असे म्हणत अडीच हजार वर्षांपूर्वी याच भारतभूमीतून संपूर्ण जगाला हा संदेश देण्यात आल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. 21 व्या शतकातील हा काळ संपूर्ण जगाला नवी दिशा देणारा असून, हीच ती वेळ आहे जेव्हा जुनी आव्हाने आपल्या सर्वांकडून नवीन समाधान मागत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube