Download App

Vinesh Fogat : आत्तापर्यंत करोडोंची ऑफर धुडकावली; विनेश फोगटचं प्रत्युत्तऱ

कुस्तीपट्टू विनेश फोगटने 4 कोटींच्या ऑफरवरुन ट्रोल करणाऱ्यांना ट्विटरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलंय.

Vinesh Fogat : कुस्तीपट्टू विनेश फोगटला (Vinesh Fogat) हरियाणा सरकारकडून 4 कोटी रुपये रोख आणि प्लॅट देण्याची खुली ऑफर देण्यात आलीयं. या ऑफरला विनेश फोगटने चोख प्रत्युत्तर दिलंय. आत्तापर्यंत करोडोंची ऑफर धुडकावलीयं, जे 2 रुपयांत ट्विट करतात अन् मोफत ज्ञान शेअर करीत असल्याचं ट्विट विनेश फोगटने केलंय.

विनेश फोगट ट्विटमध्ये म्हणाली, “लक्षपूर्वक ऐका! 2 रुपयांचं ट्विट करतात अन् मोफत ज्ञान देतात. तुमच्या माहितीसाठी सांगते, आत्तापर्यंत मी कोट्यावधींच्या ऑफर नाकारल्या आहेत. सॉफ्ट ड्रिंक्स ते ऑनलाईन गेमिंगपर्यंत मी तत्वांशी कधीच तडजोड केलेली नाही. माझ्या प्रामाणिकपणाने आणि कठोर परिश्रमाने मी सर्व काही साध्य केलंय, मला त्याचा अभिमान आहे” असं ट्विट विनेशने केलंय.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘हे’ कार्ड नसल्यास सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, फक्त 3 दिवसांची मुदत

दरम्यान, नायब सिंह सैनी सरकारने विनेश फोगटला 4 कोटी रुपये देण्याची घोषणा केली, त्यानंतर काही लोकांनी भाजप सरकारकडून पुरस्कार स्वीकारल्याबद्दल सोशल मीडियावर विनेशला टार्गेट केलं जातंय, या टार्गेटवरुन विनेशने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलंय.

आपल्या ट्विटमध्ये पुढे विनेश म्हणाली, मी ज्या भूमीची कन्या आहे जिथे स्वाभिमान आईच्या दुधात विरघळतो. मी माझ्या पूर्वजांकडून शिकलेयं, हक्क हे हिसकावले जात नाहीत तर ते जिंकले जातात. वेळ पडल्यासस लोकांना कसे बोलायचं हे माहित असतं. जेव्हा आपला माणूस संकटात असतो तेव्हा त्याच्यासोबत भींतीसारखे कसे उभे राहायचे हेही माहित असतं” असं विनेश म्हणालीयं.

follow us

संबंधित बातम्या