ब्रिजभूषण यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या महिलांची सुरक्षा हटवली; कुस्तीपट्टू विनेश फोगटचा दावा

ब्रिजभूषण यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या महिलांची सुरक्षा हटवली; कुस्तीपट्टू विनेश फोगटचा दावा

Vinesh Phogat : कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brijbushan Singh) यांच्याविरोधात साक्ष देणाऱ्या महिलेची सुरक्षा पोलिसांनी काढून घेतली असल्याचा दावा महिला कुस्तीपट्टू विनेश फोगटने केला आहे. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपट्टूंनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केलायं. या प्रकरणी साक्ष देण्याआधीच साक्षीदार महिलेची सुरक्षा पोलिसांकडून काढण्यात आल्याचा दावा विनेश फोगटने केलायं. यासंदर्भात विनेश फोगटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीयं.

विनेश फोगट पोस्टमध्ये म्हणाली, “ज्या महिला ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात न्यायालयात साक्ष देणार आहेत, त्यांची दिल्ली पोलिसांनी सुरक्षा हटवली आहे.” असं पोस्टमध्ये म्हटलंय. विनेशने यासंदर्भात एक्सवर पोस्ट करताना दिल्ली पोलिसांसह दिल्ली महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगालाही टॅग केले आहे. ब्रिजभूषण विरोधात कोर्टात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा दिल्ली पोलिसांनी हटवलीयं. या पोस्टद्वारे विनेश फोगटने दिल्ली पोलिसांवर सुरक्षा हटवल्याचा आरोप केला आहे.

महाराष्ट्रातील तरूण जर्मनी गाजवणार! वाचा भाषेच्या प्रशिक्षणापासून ते उपलब्ध संधींची A To Z माहिती…

दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात 15 जून 2023 रोजी दिल्ली पोलिसांनी कलम 354, 354-अ, आणि कलम 506 अंतर्गत आरोपपत्र दाखल केलं होतं. या प्रकरणात ब्रिजभूषण यांच्यावर सहा कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्याच आधारावर ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. त्याचबरोबर, दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह 30 पेक्षा अधिक कुस्तीपटूंनी आंदोलन केलं होतं. कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणी साक्ष सुरू आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube