मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार: पोलिसांकडून रॅलीवर लाठीचार्ज, 30 हून अधिक विद्यार्थी जखमी

Manipur Violence : काही दिवसांपूर्वी मणिपूरमधील हिंसाचार थांबल्याचे राज्य आणि केंद्र सरकारने सांगितले होते. पण आता पुन्हा हिंसाचाराने डोके वर काढले आहे. याचे कारण म्हणजे महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या निषेध रॅलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज. यामध्ये 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा तणाव वाढला आहे. मणिपूरमधील हिंसाचारामुळे (Manipur Violence) आजपासून पाच दिवस […]

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार! अंदाधुंद गोळीबारात दोघांचा मृत्यू

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार! अंदाधुंद गोळीबारात दोघांचा मृत्यू

Manipur Violence : काही दिवसांपूर्वी मणिपूरमधील हिंसाचार थांबल्याचे राज्य आणि केंद्र सरकारने सांगितले होते. पण आता पुन्हा हिंसाचाराने डोके वर काढले आहे. याचे कारण म्हणजे महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या निषेध रॅलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज. यामध्ये 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा तणाव वाढला आहे.

मणिपूरमधील हिंसाचारामुळे (Manipur Violence) आजपासून पाच दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. 1 ऑक्टोबर संध्याकाळी 7.45 पर्यंत इंटरनेट खंडीत राहणार आहे. पाच महिन्यांनी राज्यात इंटरनेट सेवा पूर्ववत झाली होती.

याशिवाय राज्यातील सर्व शाळाही तीन दिवस बंद राहणार आहेत. बुधवार (27 सप्टेंबर) आणि 29 सप्टेंबर (शुक्रवारी) शाळांना सुटी असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. तर 28 सप्टेंबर (गुरुवार) ही ईद-ए-मिलादनिमित्त आधीच अधिकृत सुट्टी आहे.

पुन्हा हिंसाचार का सुरू झाला?
मणिपूरमध्ये जुलैपासून बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे सोमवारी (25 सप्टेंबर) सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर इंफाळमधील शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा तणाव वाढला आहे.

World Cup 2023: विश्वचषकापूर्वी श्रीलंकेला धक्का, हसरंगा दुखापतीने टीममधून बाहेर

मणिपूरमध्ये 3 मे रोजी दोन समुदायांमध्ये हिंसाचार सुरू झाला होता. यानंतर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले. या हिंसाचारात आतापर्यंत 175 लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत. गुन्ह्यांचा तपास सीबीआय करत आहे.
Video: पुण्यातील साने गुरुजी मित्रमंडळाच्या देखाव्याला आग, आरतीला आलेल्या जेपी नड्डांचीही पळापळ !

Exit mobile version