Download App

महाकुंभाच्या व्हायरल आयआयटी बाबाला मारहाण; लाइव्ह शोमध्ये घडला धक्कादायक प्रकार

आयआयटी बाबा अभय सिंह ग्रेवाल यांना मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

IIT Baba Abhay Singh : प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यातून प्रसिद्धीच्या (Prayagraj Mahakubh 2025) झोतात आलेल्या (IIT Baba Abhay Singh) आयआयटी बाबा अभय सिंह ग्रेवाल बाबत मोठी बातमी समोर आली आहे. आयआयटी बाबाला मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. बाबाने स्वतः इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. नोएडातील एका न्यूज चॅनेलच्या डिबेटमध्ये भाग घेण्यासाठी आयआयटी बाबा गेले होते. येथे त्यांच्याशी गैरवर्तन आणि मारहाण करण्यात आली. घटनेनंतर आयआटी बाबाने पोलीस चौकीसमोर आंदोलन केले. पोलिसांनी मात्र त्यांची समजूत काढून त्यांना माघारी पाठवून दिले.

आयआयटी बाबांनी दिलेली लेखी तक्रार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. नोएडातील सेक्टर 126 भागातील एका न्यूज चॅनेलच्या डिबेटमध्ये भाग घेण्यासाठी गेलो होतो. परंतु, येथे उपस्थित असणाऱ्या काही लोकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली असे या तक्रारीत म्हटले आहे.

काही लोकांनी अचानक घेरा घातला आणि धक्काबुक्की केली. या घटनेनंतर अभय सिंह यांनी तडक पोलीस स्टेशन गाठले आणि येथेच आंदोलनाला सुरुवात केली. न्यूजरुममध्ये उपस्थित असणाऱ्याय लोकांनी जाणूनबुजून मला टार्गेट केले आणि मारहाण केली असा आरोप अभय सिंह यांनी केला.

या घटनेची माहिती स्वतः आयआयटी बाबाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली. ज्यावेळी मी डिबेटमध्ये भाग घेण्यासाठी गेलो होतो त्यावेळी काही लोक अचानक स्टुडिओत घुसले आणि माझ्यावर हल्ला केला. एका व्यक्तीने तर थेट लाठीनेच मारहाण केली आणि मला बळजबरीने एका खोलीत बंद करण्यात आले. हा हल्ला जाणूनबुजून करण्यात आल्याचा आरोप आयआयटी बाबाने केला.

आयआयटीयन बाबांची महाकुंभातून हकालपट्टी; कोणाकडे असतो कुंभातून बाहेर काढण्याचा अधिकार?

महाकुंभातून झाली होती हकालपट्टी

प्रयागराज येथील महाकुंभातूनच आयआयटी बाबाला प्रसिद्धी मिळाली होती. कुंभमेळा सुरू असताना आयआयटी बाबा अभय सिंह जुना आखाड्यातील मडी आश्रमात राहत होते. परंतु, सोशल मीडियावर आयआयटी बाबांनी गुरुंबद्दल अपशब्द वापरले म्हणून त्यांची या कुंभमेळ्यातूनच हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतरही आयआयटी बाबा सातत्याने चर्चेत आहेत. आता तर मारहाणीच्या प्रकाराने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

follow us