Download App

वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांच्यात दुरावा, लवकरच घेणार ग्रे घटस्फोट, नेमका काय असतो हा घटस्फोट?

विरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून आता ते ग्रे घटस्फोट (Divorce) घेणार आहेत.

  • Written By: Last Updated:

Gray Divorce: माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सध्या त्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. सेहवाग आणि त्याची पत्नी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून आता ते विभक्त होणार असल्याचे बोललं जातंय. ते लवकरच त्यांचा घटस्फोट (Divorce) घेणार आहेत. त्यांचा घटस्फोट हा ग्रे घटस्फोट (Gray Divorce) असण्याची शक्यता आहे. दरम्यान, ग्रे घटस्फो म्हणजे काय? याच विषयी जाणून घेऊ.

वायरलेसचा वापर अन् ‘K’ लिहिलेल्या गाड्या, स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या कुंभमेळ्यासाठी रेल्वेने केली होती खास तयारी 

कोणत्या सेलिब्रिटींनी घेतलाय ग्रे घटस्फोट?
बी-टाउन सेलिब्रिटींमध्ये आजकाल ग्रे घटस्फोट खूप ट्रेंडमध्ये आहे. कमल हसनने त्याची पत्नी सारिका हिच्याकडून ग्रे घटस्फोट घेतला होता. याशिवाय बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खाननेही मलायका अरोरा हिच्याकडून ग्रे घटस्फोट घेतला होता. चित्रपट निर्माते प्रकाश झा आणि त्यांची पत्नी दीप्ती नवल देखील १७ वर्षांच्या लग्नानंतर वेगळे झाले. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही त्यांच्या पत्नीपासून ग्रे घटस्फोट घेतला.

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी १९ वर्षे संसार केल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे आता वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांनीही २१ वर्षांच्या लग्नानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

ग्रे घटस्फोट म्हणजे काय?
जेव्हा एखादे जोडपे साधारणपणे पन्नाशीनंतर घटस्फोट घेते तेव्हा त्याला ‘ग्रे घटस्फोट’ म्हणतात. म्हणजे, नेहमीच्या घटस्फोटासारखाच तो असतो, फक्त घटस्फोटित होणारी जोडपी साधारण त्यांच्या वयाची पन्नाशी गाठलेली असतात. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर, जेव्हा एखादे जोडपे लग्नानंतर १५ ते २० वर्षे एकत्र राहतात आणि बराच काळ एकत्र राहिल्यानंतर काही कारणांमुळं वयाच्या पन्नासीमध्ये घटस्फोट घेतात तेव्हा तो ‘ग्रे घटस्फोट’ असतो.

ग्रे घटस्फोटाचा ट्रेंड का वाढत आहे?

प्रेम आणि सुसंवादाचा अभाव

लग्नाच्या अनेक वर्षांनंतर, जेव्हा मुले मोठी होतात, तेव्हा पती-पत्नी यांच्यात नात्यात प्रेम आणि सुसंवाद उरत नाही. किंवा भावनिक अंतर कमी होतं, त्यामुळं अनेकजण ग्रे घटस्फोट घेतात.

आर्थिक स्वातंत्र्य

सध्या मोठ्या प्रमाणावर महिला घर सांभाळून, नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत. त्या पूर्वीपेक्षा अधिक स्वावलंबी झाल्या आहेत. त्या स्वतः स्वत:ला सांभाळू शकतात. मात्र, बऱ्याचदा आर्थिक स्वातंत्र्य मिळत नसल्याने त्या ग्रे घटस्फोट घेतात.

दुसरे प्रेम शोधणे
बऱ्याचदा अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर नात्याचा कंटाळा यायला लागतो. त्या कारणामुळेही घटस्फोट घेतला जातो. किंवा आयुष्यात कुणीतरी दुसरी व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीविषयी आपलेपणा वाटायला लागतो, त्यावेळी घटस्फोटाची शक्यता वाढते.

 

follow us