Download App

वसुंधराराजे, शिवराज सिंहंचा पत्ता कट; मोदी-शाहंची नवी खेळी अन् प्रस्थापितांना धक्का

  • Written By: Last Updated:

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदावर नव्यांना संधी देत मोदी- शाहंनी पुन्हा एकदा सरप्राइज देत सर्वांनाच धक्का दिला आहे. गेल्याकाही वर्षात भाजपमध्ये नव्या आणि चर्चेत नसलेल्या तळागाळातील चेहऱ्यांना संधी देण्याची परंपरा सुरू झाली आहे. यापूर्वीदेखील भाजपने मनोहर लाल खट्टर, रघुवर दास, भूपेंद्र पटेल, प्रमोद सावंत (Pramod Sawant), पुष्कर धामी यांच्यावर बाजी लावली होती. हे सर्व नेते भाजपसाठी काही प्रमाणात यशस्वी ठरले. त्यामुळे आता राजस्थानमध्ये (Rajasthan)  भजनलाल शर्मा, छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) विष्णुदेव साय आणि मध्य प्रदेशात मुख्यमंत्री बनवण्यात आलेले मोहन यादव हे तिघे मोदी-शाहंसाठी डार्क हॉर्स ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘तुमच्यासोबत आम्हीही जिंकण्याचं स्वप्न पाहत होतो पण..,’; रोहित शर्मा भावूक

डार्क हॉर्स म्हणजे काय?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा डार्क हॉर्स प्रकार नेमका काय आहे? तर, डार्क हॉर्स म्हणजे ज्या व्यक्ती काम तर करत असतात परंतु, त्यांच्या नावांची चर्चा कुठेच नसते. नुकत्याच तीन राज्यांमध्ये भाजपनं मुख्यमंत्री म्हणून संधी दिलेल्या साय, यादव आणि शर्मा यांच्या नावांची चर्चा अजिबात नव्हती. त्यामुळे हे तिघेही भाजपसाठी डार्क हॉर्स मानले जात आहेत. आता त्यांना दिलेली जबाबदारी ते कशी पार पाडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपकडून नव्या नेतृत्वाची तयारी

गेल्या काही वर्षांपासून भाजप मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुका लढवता दिसून येत आहे. याआधी भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर ठेवून निवडणुका लढवत होता. मात्र, यात गेल्या काही निवडणुकांपासून बदल करण्यात आला असून, आता निवडणुकांच्या निकालांनंतर सर्व बाबींचा बारकाईने आढावा घेत मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर केले जात आहे. यात नव्या चेहऱ्याच्या कामगिरीपासून ते व्होट बँक आणि रिपोर्ट कार्डपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली जात आहे. या सर्व गोष्टी पाहता भाजपकडून येणाऱ्या भविष्यातील राजकारणासाठी नव्या नेतृत्त्वाची तयारी केली जात असल्याचे अधोरेखित होत आहे.

Parliament Security Breach : संसदेत धूर करून ‘तानाशाही नहीं चलेगी’ म्हणणारे चौघं कोण?

खट्टर, पटेल, सावंत आणि धामी ठरले डार्क हॉर्स

यापूर्वी देशातील काही राज्यांमध्ये भाजपनं नव्या चेहऱ्यांना संधी देण्यास सुरूवात केली आहे. याची सुरूवात 2014 मध्यो मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर हरियाणाच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात मुख्यमंत्रीपदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र, संधी देण्यात आली ती गैर-जाट नेते मनोहर लाल खट्टर यांना. भाजपची ही खेळी यशस्वी ठरली आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. यानंतर दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाशी युती करत खट्टर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.

2014 मध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आनंदीबेन पटेल यांना संधी देण्यात आली. त्यानंतर ऐन निवडणुकांच्या तोंडावर सप्टेंबर 2021 मध्ये भूपेंद्र पटेल यांच्यावर बाजी लावण्यात आली. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पटेलांनी केंद्राशी ताळमेळ साधत सरकारला चांगल्या पद्धतीने हाताळले. याचेच फळ 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बंपर विजयाच्या स्वरूपात मिळाले.

रोहित पवार बिनडोक, तर पडळकरांनी संघर्ष यात्रेचा सल्ला देणाऱ्याचीही अक्कल काढली

ज्या पद्धतीने हरियाणा, गुजरातमध्ये नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून बसवण्यात आले, त्याच पद्धतीने गोव्यातही दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपनं नव्या चेहऱ्याला संधी देत 2019 मध्ये प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री केले. पक्षाची ही चाल यशस्वी ठरली आणि 2022 च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आणि सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

वरील तीन राज्यांप्रमाणे भाजपनं उत्तराखंडमध्येही चर्चेतील नावांना बगल देत मुख्यमंत्रीपदावर नव्या चेहऱ्याला संधी दिली. भाजपने 2021 मध्ये उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला होता. त्यानंतर राज्यात घडलेल्या अनेक घटनांकडे कानडोळा करत भाजपनं 2022 च्या निवडणुकांनंतर पुन्हा धामी यांच्यावर विश्वास टाकत त्यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान केले. त्यामुळे ज्या पद्धतीने भाजपसाठी धामी, सावंत, खट्टर आणि पटेल डार्क हॉर्स म्हणून यशस्वी ठरले त्याच पद्धतीने पुन्हा एकदा पक्षाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, साय, यादव आणि शर्मा पक्षासाठी डार्क हॉर्स ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us