रोहित पवार बिनडोक, तर पडळकरांनी संघर्ष यात्रेचा सल्ला देणाऱ्याचीही अक्कल काढली

रोहित पवार बिनडोक, तर पडळकरांनी संघर्ष यात्रेचा सल्ला देणाऱ्याचीही अक्कल काढली

Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना संघर्ष यात्रेवरून जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, संघर्ष यात्रा अयशस्वी झाली म्हणून रोहित पवार स्टंट करत आहेत. पण रोहित पवार बिनडोक माणूस असून त्यांना सल्ला देणारे देखील बेअक्कल आहेत. अशी टीका पडळकरांनी केली आहे.

Dunki: शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाची प्रेक्षकांवर जादू; ॲडव्हान्स बुकिंगला मोठी गर्दी

भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना संघर्ष यात्रेवरून जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी थेट रोहित पवारांना बिनडोक म्हटले आहे. तसेच त्यांनी रोहित पवार यांना सल्ला देणारा हा देखील बेअक्कल असल्याचं म्हटलं आहे.

Rohit Pawar : अजितदादांचं वक्तव्य चुकीचंच; रोहित पवारांनीही रोखठोक सुनावलं

पुढे बोलताना ते म्हणाले की, रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेमध्ये राडा झाला. हा त्यांची त्यांची संघर्ष यात्रा अयशस्वी झाली आहे. म्हणून स्टंटबाजी आहे. त्यांनी कधी संघर्ष पाहिला आहे का? संघर्ष आणि रोहित पवार यांचा संबंध नाही. असा सवाल माध्यमांशी बोलताना पडळकरांनी केला आहे. तसेच राज्यात कुठेही त्यांच्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही. ही यात्रा फेल झाली आहे. त्यामुळे ते असे केविलवाणे प्रयत्न करत आहेत.

युवा संघर्ष यात्रेला गालबोट…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यांच्या युवा संघर्ष यात्रेला गालबोट लागलं. उपराजधानी नागपुरात काल (12 डिसेंबरला ) युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला. या समारोपाला महाविकास आघाडीचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमातून संजय राऊतांसह इतर नेत्यांनी सरकारवर चांगलीच तोफ डागली. त्यानंतर ही संघर्ष यात्रेतील कार्यकर्ते थेट विधानभवनाकडे निघाल्याने मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांनी रोखलं मात्र, पोलिसांनाही कार्यकर्त्यांना न जुमानल्याचं पाहायला मिळालं आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांसह रोहित पवार यांनाही ताब्यात घेतलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube