Download App

Karnataka Assembly Elections : मतदारांनो ‘जय भवानी जय शिवाजी’ नारा द्या, उद्धव ठाकरेंचं आवाहन

कर्नाटकव्याप्त मराठी भाषिकांना ‘जय भवानी जय शिवाजी’ नारा द्या, असं आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. येत्या 10 मे रोजी कर्नाटकात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील मतदारांना ‘बजरंग बली की जय’ म्हणत मतदान करा, असं आवाहन केलं. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनीही मतदारांना आवाहन केलंय.

Patna High Court : नितीश कुमार सरकारला हायकोर्टाचा मोठा झटका! जातनिहाय जनगणनेला अंतरिम स्थगिती

उद्धव ठाकरे म्हणाले, काही वर्षांपूर्वी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता. मतदाराचा अधिकार आयोगाकडून कसा काढला जातो हे मला माहित नाही. आता अगदी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकच्या मतदारांना ‘बजरंग बली की जय’ असा नारा देऊन मतदान करण्याचं आवाहन करीत आहेत. जर कायद्यात असा काही बदल झाला असेल त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी असं सांगत असल्याचा उपरोधिक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

ABP C Voter Survey : शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण होणार? सर्वेक्षणात ‘या’ नावाला पसंती

ज्याअर्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारांना सांगताहेत त्याचं पद्धतीने आता कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राच्या मतदारांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ नारा देऊन मतदान करा, असं उद्धव ठाकरेंनीही आवाहन केलंय. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राच्या मतदारांवर कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरीही त्यांच्यावर भाषिक अत्याचार होत आहे. त्यामुळं आता ‘जय भवानी जय शिवाजी’ नारा देऊन एकीकरण समितीच्याच उमेदवारांनाच मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय.

संजय राऊतांकडून काँग्रेसची दलाली; फडणवीसांचा हल्लाबोल

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका रात्रीतून हटवण्यात आला होता. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतानाच उद्धव ठाकरे यांनी शिवरायांचा पुतळा हटवल्याची छायाचित्रे दाखवली आहेत. त्यामुळे आता जनतेने विचार करुनच मतदान करायला हवं, तुमच्यावर भाषिक अत्याचार होतोय तर ‘जय शिवराय’ नारा देऊन एकजूटीला जपणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मोदींनी जनतेच्या हिताचं बोललं पाहिजे, निवडणुकीत अत्याचार करणाऱ्यांना कर्नाटकाच्या सीमाभागातील जनतेनं जागा दाखवून द्यावी. बजरंग बली तर बलवान होतेच तुम्ही तुमचं बल दाखवा ना, असं खुलं आव्हानच त्यांनी दिलं आहे. या निवडणुकीत कर्नाटकात आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून कर्नाटकात प्रचारफेऱ्या सभा पार पडत आहे. येत्या 10 मे रोजी मतदान पार पडणार असून कोणाचं पारडं किती जड? हे आता मतदानानंतरच येत्या 13 मे रोजी स्पष्ट होणार आहे.

Tags

follow us