संजय राऊतांकडून काँग्रेसची दलाली; फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadanvis attack ON Sanjay Raut : भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. यावेळी ते कर्नाटक येथून बोलत होते. सध्या कर्नाटक राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. त्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकमध्ये आले आहेत. त्यांनी सीमा भागामध्ये प्रचार केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी इथे येणार नाही. ते काँग्रेसची दलाली करण्यासाठी इथे येत आहेत, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आम्हाला सांगण्यापेक्षा त्यांच्या मित्र पक्ष काँग्रेस आहे. त्यांनी काँग्रेसला सांगायला पाहिजे होते की, तुम्ही इथे उमेदवार उभे करु नका. तुम्ही त्यांच्या नेत्यांना प्रचाराला आणू नका, ते असे बोलत नाहीत. कारण काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मतं कमी करण्याकरिता काँग्रेसची दलाली करण्यासाठी संजय राऊत इथे आले आहेत, असा घणाघात फडणवीसांनी राऊतांवर केला आहे.
Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार
तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमूख यांची देखील आठवण सांगितली. विलासराव देशमूख मुख्यमंत्री असताना ते कर्नाटक येथील काँग्रेसचे इंचार्ज होते. तेव्हा ते निवडणूक प्रचारात संपूर्ण कर्नाटकात फिरत होते, असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, सध्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस बेळगाव, निपाणी या सीमावर्ती भागात प्रचारासाठी जात आहेत. या भागात संजय राऊत हे देखील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे हिंदुत्व 300 रुपयांना मिळते अशी टीका केली होती. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी जोरदार उत्तर दिले आहे.