आज ‘वक्फ सुधारणा’ विधेयक लोकसभेत; विरोधक आक्रमक होणार, वाचा, कुणाकड किती संख्याबळ?

लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी सांगितलं की, केंद्र सरकार आपला अजेंडा सर्वांवर लादण्याचा प्रयत्न करत

आज 'वक्फ सुधारणा' विधेयक लोकसभेत; विरोधक आक्रमक होणार, वाचा, कुणाकड किती संख्याबळ?

आज 'वक्फ सुधारणा' विधेयक लोकसभेत; विरोधक आक्रमक होणार, वाचा, कुणाकड किती संख्याबळ?

Waqf Board Amendment Bill : आज लोकसभेमध्ये चर्चेसाठी वक्फ सुधारणा विधेयक मांडल जाणार आहे. त्याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध सुरू आहे. या विधेयकावर सभागृहात सुमारे (Waqf Board) आठ तास चर्चा होणार असून नंतर वक्फ सुधारणा, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हे उत्तर देतील, असं सूत्रांनी मंगळवारी सांगितलं. त्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यासाठी मतदान घेतलं जाण्याची शक्यता आहे.

वक्फ बोर्ड तुमच्या पप्पाची जहागीर नाही, इम्तियाज जलील यांचं सडेतोड भाष्य

लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी सांगितलं की, केंद्र सरकार आपला अजेंडा सर्वांवर लादण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे विरोधक लोकसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून निघून गेले. काँग्रेसच नाही तर इतरही काही पक्षांचा याला तीव्र विरोध आहे. त्यामुळे यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

लोकसभेत दुपारी

१२ वाजता हे विधेयक चर्चेसाठी ठेवले जाईल, गुरुवारी राज्यसभेत हे विधेयक सादर होईल.

दोन्ही सभागृहांमध्ये संख्याबळाचे गणित

खासदार                             लोकसभा      राज्यसभा
एकूण खासदार                     ५४३             २३६
बहुमतासाठी आवश्यक        २७२             ११९
एनडीए                               २९३               १२१
इंडिया                                २३५                ८५
अन्य                                   १५                    ३०

(लोकसभेत टीडीपी-जदयूच्या २८ खासदारांवर अवलंबून)
(राज्यसभेत ६ नामनिर्देशित खासदारांच्या पाठिंब्यावर अवलंबून)

Exit mobile version