Download App

पश्चिम बंगाल : मिथून चक्रवर्तींच्या रोड शोत दगडफेक; भाजप-टीएमसी कार्यकर्ते भिडले

भाजपा नेते मिथून चक्रवर्ती यांच्या रोड शो दरम्यान दगडफेक करण्यात आली. मंगळवारी मिथून चक्रवर्ती यांचा मिदनापूर शहरात रोड शो होता.

West Bengal Lok Sabha Election : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत टीएमसी आणि भाजपात संघर्ष आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत येथे प्रत्येक टप्प्यात जास्त मतदान झालं आहे. निवडणूक आणि हिंसाचार दगडफेक हे समीकरणच येथे आहे. आताही अशा घटना घडत आहेत. मंगळवारी अभिनेते आणि भाजपा नेते मिथून चक्रवर्ती यांच्या रोड शो दरम्यान दगडफेक करण्यात आली. मंगळवारी मिथून चक्रवर्ती यांचा मिदनापूर शहरात रोड शो होता. याचवेळी काही लोकांनी दगडफेक केली. मिदनापूर मतदारसंघातील भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे. पंरतु, टीएमसीने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

या घटनेत मिथून चक्रवर्ती आणि पॉल दोघेही सुरक्षित आहे. हा रोड शो कलेक्ट्रेट मोडमध्ये सुरू झाला होता आणि केरानिटोलाकडे निघाला होता. या रोड शोमध्ये हजारो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. रोड शो शेखपुरा परिसरात आला त्याचवेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही लोकांनी दगड आणि बाटल्यांचा मारा केला. यानंतर भाजपचे कार्यकर्तेही चिडले. त्यांनीही प्रत्युत्तर दिले त्यामुळे दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली.

West Bengal Violence: हिंसाचारप्रकरणी उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना फटकारले, 5 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

यानंतर पॉल यांनी सांगितले की, भाजपाला बंगालमध्ये पाठिंबा वाढत चालला आहे. त्यामुळे तृणमूलचे काँग्रेसच्या नेत्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून गुंडागर्दी केली जात आहे. मिथून चक्रवर्ती यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याचा अपमान करण्यासाठी टीएमसीने इतकी खालची पातळी गाठली अशा शब्दांत भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांनी संताप व्यक्त केला.

यानंतर तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते त्रिनांकूर भट्टाचार्य यांनी हे सर्व आरोप नाकारले आहेत. अशा पद्धतीच्या कृत्यांवर आम्ही विश्वास ठेवत नाही. रोड शो फ्लॉप झाल्याने भाजपकडून अशी नाटकं केली जात आहेत, असा टोला भट्टाचार्य यांनी लगावला. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे.

Mamata Banerjee : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ममता बॅनर्जी स्पष्टच बोलल्या, ‘मी सनातन धर्माचा’

follow us