Kolkata Doctor Case : कोलकात्यातील ट्रेनी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाने (Kolkata Doctor Case) संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आज (17 ऑगस्ट) दिवसभर दवाखाने बंद राहणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएश़नच्या (IMA) झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. आयएमएचे म्हणणे आहे की गुरुवारी प्रदर्शनकारी डॉक्टरांना ज्या पद्धतीने वागणूक देण्यात आली त्याचा निषेध म्हणून संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. या संपाचा परिणाम देशभरातील आरोग्य व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. दिल्ली ते तामिळानाडूपर्यंत हा बंद राहणार आहे.
आएमएने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मॉडर्न मेडिसीन्सचे डॉक्टर 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत संपावर राहणार आहेत. या काळात रुग्णांना फक्त अत्यावश्यक आरोग्य सुविधा दिल्या जातील. कोलकाता बलात्कारच्या घटनेने प्रचंड आक्रोश आहे. या काळात राज्यात तीव्र आंदोलने होत असून महिला मोठ्या संख्येने या आंदोलनांत सहभागी झाल्या आहेत.
ISRO: इस्रो आज ऐतिहासिक प्रक्षेपण करणार; देशाला नवीन सॅटेलाईटद्वारे आपत्तींची माहिती मिळणार
एएनआय वृत्तसंस्थेनुसार आयएमएने (Indian Medical Association) एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. कोलकात्यातील आरजी कर रुग्णालयात क्रूर अपराध आणि गुरुवारी आंदोलनकर्त्या डॉक्टरांविरुद्ध झालेल्या गुंडगिरी वर्तणुकीच्या विरोधात संप पुकारण्यात आला आहे. आयएमएने स्पष्ट केले आहे संपकाळात सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. नियमित ओपीडी सेवा मात्र बंद राहणार आहेत. हा संप जेथे मॉडर्न मेडिसीन डॉक्टर कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी होणार आहे.
दरम्यान, कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या अतिशय क्रूर घटनेत आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत.
ध्रुव राठीच्या अडचणी वाढणार! कोलकाता प्रकरणात केली ‘ही’ गंभीर चूक
दरम्यान, कोलकात्यात ट्रेनी डॉक्टर महिलेवरील बलात्काराच्या विरोधात (Kolkata Doctor Case) ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. बुधवारी मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त झालेल्या आंदोलकांनी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली. या आंदोलना दरम्यान वाहने आणि सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले. या भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स हटवण्यात आले. हॉस्पिटलबाहेर उभ्या असलेल्या एका दुचाकी वाहनाला आग लावून दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला तसेच गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही केला.